(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahsan Iqbal : 'चहा कमी प्या', देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी पाकिस्तानी मंत्र्यांचा सल्ला
पाकिस्तानमधील मंत्री अहसान इक्बाल (Ahsan Iqbal) यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सल्ला दिला आहे.
Ahsan Iqbal : सध्या पाकिस्तान (Pakistan) हा देश आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या देशांचे सरकार हे पेट्रोल-डिझेल दर वाढ यांसारखे निर्णय घेतल असतात. पण देशाची आर्थिक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आणि देशाला आर्थिक संकटातून बाहेर आणण्यासाठी पाकिस्तानमधील मंत्री अहसान इक्बाल (Ahsan Iqbal) यांनी पाकिस्तानच्या नागरिकांना देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी एक सल्ला दिला आहे. त्यांनी पाकिस्तानमधील नागरिकांनी देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चहा प्यायचे प्रमाण कमी करण्यास सांगितले आहे.
'जर प्रत्येकानं एक-दोन कप चहा कमी प्यायला तर पाकिस्तानचे आयात बिल कमी होईल. त्यासाठी पाकिस्तानमधील नागरिकांनी चहा प्यायचे प्रमाण कमी करावे', असं ज्येष्ठ मंत्री अहसान इक्बाल यांनी सांगितले. पुढे अहसान इक्बाल म्हणाले की, 'सध्या देशाचा परकीय चलनाचा साठा कमी आहे. हा साठा दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी पूरेल. यामुळे देशाला परकीय चलनाची गरज आहे.'
देश कर्ज घेऊन चहाची आयात करतोय: अहसान इक्बाल
इक्बाल यांनी सांगितलं, 'पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा चहा आयात करणारा देश आहे, ज्याने गेल्या वर्षी 600 मिलीयन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या चहाची खरेदी केली. मी देशातील नागरिकांना कमी चहा प्यायचे आवाहन करतो. कारण सध्या कर्ज घेऊन चहाची आयात केली जात आहे,"
चहाच्या विक्रेत्यांनाही दिला सल्ला
चहाची विक्री करणाऱ्यांना इक्बाल यांनी सल्ला दिला आहे, वीज वाचवण्यासाठी चहा विक्रेते त्यांचे स्टॉल 8.30 वाजता बंद करू शकतात, असं ते म्हणाले. आता पाकिस्तानी नागरिक अहसान इक्बाल यांचा हा सल्ला ऐकणार का? आणि त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुरळीत होईल का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पाहा व्हिडीओ :
हेही वाचा :