IND vs AUS : श्रेयसचं प्रमोशन, जडेजा अन् सॅमसनला डच्चू, शतकवीर जुरेलला लॉटरी, शमीचं करिअर संकटात, संघ निवडीचे पाच अर्थ
Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेसाठी शुभमन गिलकडे संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. श्रेयस अय्यरचं उपकर्णधार म्हणून प्रमोशन करण्यात आलं आहे.

मुंबई : भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर वनडे मालिका आणि टी 20 मालिका खेळणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्त्वातील निवड समितीनं वनडे संघाचं नेतृत्व देखील शुभमन गिलकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी शुभमन गिल कॅप्टन तर श्रेयस अय्यर उपकॅप्टन असेल. निवड समितीनं संघ निवडीतून आगामी स्पर्धांचा विचार करत असल्याचं दाखवून दिलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघाचा भाग असतील. तर, चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणाऱ्या मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघात स्थान मिळालेलं नाही. रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांना देखील वनडे मध्ये स्थान मिळू शकलेलं नाही.
Team India ODI Team for Australia Tour : वनडेच्या संघ निवडीमागचे अर्थ
निवड समितीनं वनडे चा संघ निवडताना 2027 चा वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवल्याचं दिसतं. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना संघात स्थान देण्यात आलंय. मात्र, शुभमन गिलकडे वनडेचं कर्णधारपद देखील सोपवलं गेलंय. सध्या वनडेचे सामने कमी प्रमाणात होतात, त्यामुळं त्याला तयारीसाठी वेळ देण्याच्या उद्देशानं संघाची जबाबदारी शुभमन गिलवर सोपवण्यात आली आहे. भारत अ चं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरची उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे.
निवड समितीनं वनडे मालिकेसाठी रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनला वगळलं आहे. तर, ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डीवर विश्वास दाखवण्यात आला आहे. बॅक अप विकेटकीपर म्हणून ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. वेस्ट इंडीज विरुद्ध शतक करणाऱ्या ध्रुव जुरेलला लॉटरी लागलीय. यशस्वी जयस्वाल यानं देखील कमबॅक केलंय.
मोहम्मद शमीचं करिअर संकटात
टीम इंडियाचा ज्येष्ठ आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी देण्यात आलेली नाही. शमीला दुखापतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत संघात स्थान देण्यात आलं होतं. यावेळी वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा यांना स्थान दिलं गेलंय. यात देखील आगामी वर्ल्ड कप
जसप्रीत बुमराहला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली असली तरी त्याला टी 20 संघात स्थान देण्यात आलं आहे. जसप्रीत बुमराहसाठी निवडसमितीचं वर्क लोड मॅनेजमेंटचं धोरण पाहायला मिळतं.
वनडेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)


















