एक्स्प्लोर

रोहित विराटची वापसी, कॅप्टन बदलला, बंडखोर श्रेयसला लाॅटरी, हार्दिकच्या जागी सुद्धा आश्चर्यकारक निवड! बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीच्या 5 तगड्या निर्णयांची चर्चा

india tour of australia 2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाचा नवा संघ जाहीर; शुभमन गिल कर्णधार, सूर्यकुमार यादव टी-20 नेतृत्व करणार, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुनरागमन.

india tour of australia 2025: आगामी बलाढ्य ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टी-20 आणि वनडेसाठी संघाची घोषणा करण्यात आली. या दौऱ्यासाठी निवड समितीने घेतलेल्या निर्णयांची सुद्धा चर्चा रंगली आहे. सर्वात धक्कादायक निर्णय कॅप्टनसीवर असून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडून काढून घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश आहे, परंतु शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गिलने कधीही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केलेले नाही. गिल आधीच कसोटी कर्णधार आहे. रोहित आणि विराटने या वर्षी 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

रोहित कॅप्टन नाही, श्रेयस अय्यरला लाॅटरी (Shreyas Iyer Vice Captain in ODIs)

विशेष कसोटी संघात स्थान न मिळाल्याने श्रेयस अय्यर नाराज असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे आशिया कप टी-20 संघातही स्थान न मिळाल्याने त्याची निराशा लपून राहिली नव्हती. वडिलांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर श्रेयसने कसोटीसाठी सहा महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवलं. या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात थेट त्याला उपकर्णधारपदी संधी देण्यात आली आहे.

रोहित आणि कोहलीचे 7 महिन्यांनंतर पुनरागमन (Rohit and Virat in ODI's)

रोहित आणि कोहली 7 महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. दोघांनीही टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. 

जडेजा आणि संजू सॅमसनला वनडेमध्ये संधी नाही (Ravindra Jadeja and Sanju Samson dropped)

दुसरीकडे, अनुभवी रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनला वनडे संघात संधी देण्यात आलेली नाही. दोघांनाही वगळण्यात आलं आहे. ध्रुव जुरेलचा बॅकअप विकेटकिपर (Dhruv Jurel is the backup WK) म्हणून संधी देण्यात आली आहे. 

बुमराहला एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती (Bumrah rested from ODI's) 

जसप्रीत बुमराहला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे, परंतु टी-20 संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत दुखापतीमुळे या दौऱ्याचा भाग नाहीत.

मोहम्मद शमीला संधीच नाही (End of the road for Shami)

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या भारतीय संघात मोहम्मद शमी होता. पण आता त्याला वगळण्यात आले आहे. तो भारताच्या कसोटी संघातूनही बाहेर आहे. त्याचे पुनरागमन अशक्य असल्याचे मानले जाते. निवडकर्ते आता त्याच्या पलीकडे पाहत आहेत.

टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार 

दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थमध्ये खेळला जाईल. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनीमध्ये खेळला जाईल. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल. सूर्यकुमार यादव टी-20 संघाचे नेतृत्व करतील.

भारताचे एकदिवसीय आणि T20 संघ

एकदिवसीय : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल

T20: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सिंह, हर्षित सिंह, संजू सॅमसन, रिंकू सिंह आणि  वॉशिंग्टन सुंदर

2027 च्या विश्वचषकात रोहित आणि कोहली खेळणार?

मुख्य निवडकर्ते अजित आगरकर म्हणाले की, "2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सहभाग अद्याप निश्चित झालेला नाही." त्यामुळे रोहितला कर्णधार बनवण्यात आलेले नाही. या संदर्भात त्याच्याशी सल्लामसलत करण्यात आली आहे. शुभमन गिलला कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व सोपवण्याबाबत ते म्हणाले की, तीनही प्रकारांसाठी तीन कर्णधार ठेवणे शक्य नाही. त्यामुळे गिलला दोन प्रकारांचे कर्णधार बनवण्यात आले आहे.

गिलने आतापर्यंत 55 एकदिवसीय सामने खेळले  

शुभमन गिलने आतापर्यंत 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 8 शतकांसह 2775 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 59.04 आहे आणि स्ट्राईक रेट 99.56 आहे. गिलला 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. त्याने सहा लिस्ट ए सामने नेतृत्व केले आहेत, त्यापैकी पाच जिंकले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget