सेम टू सेम काॅपी करण्याचा धंदा सुरुच; भारतानं 'रॉ'च्या माजी प्रमुखांना मोठी जबाबदारी देताच पाकिस्ताननं सुद्धा तेच करत ISI प्रमुखांना मोठी जबाबदारी दिली, तीन वर्षात पहिलाच निर्णय
pahalgam terror attack : यापूर्वी 30 एप्रिल रोजी, भारत सरकारने एनएसए बोर्ड (एनएसएबी) ची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ (RAW) प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

pahalgam terror attack : पहलगाममधील पर्यटकांवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. भारताने रणनीतीवर चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानकडून युद्धाची दर्पोक्ती सुरुच आहे. मंत्र्यांकडूनही आगीत तेल ओतणारी वक्तव्ये सुरु आहे. या सर्व वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आता भारताचीच सेम टू सेम काॅपी करताना आयएसआय (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक(Asim Mailk) यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती 29 एप्रिल रोजी करण्यात आली होती. परंतु, 30 एप्रिल रोजी मध्यरात्री माध्यमांमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली. सप्टेंबर 2024 मध्ये असीम मलिक यांना आयएसआय प्रमुख (Director-General of Inter-Services Intelligence of Pakistan) बनवण्यात आले होते.
गेल्या तीन वर्षांपासून पद रिक्त, मलिकांकडे आता दोन जबाबदाऱ्या
एप्रिल मध्ये मोईद युसूफ यांच्यानंतर पाकिस्तानमध्ये एनएसए नियुक्ती करण्यात आली नव्हती. या नियुक्तीनंतर, असीम मलिक यांच्याकडे आता दोन जबाबदाऱ्या (आयएसआय प्रमुख आणि एनएसए) असतील. यापूर्वी 30 एप्रिल रोजी, भारत सरकारने एनएसए बोर्ड (एनएसएबी) ची पुनर्रचना केली आहे. माजी रॉ (RAW) प्रमुख आलोक जोशी यांना अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एनएसएबी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाला माहिती देईल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली असून एनएसएबीमध्ये माजी रॉ प्रमुखांसह 7 सुरक्षा तज्ज्ञांचा समावेश आहे. यामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे माजी अधिकारी समाविष्ट आहेत. तसेच, माजी राजनयिक आणि माजी आयपीएस अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. एनएसएबी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयाला माहिती देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समिती (सीसीएस) च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी, पहलगाम हल्ल्याच्या एक दिवसानंतर 23 एप्रिल रोजी सीसीएसची बैठक झाली होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ (एनएएसएबी) ची स्थापना 1998 मध्ये पहिल्यांदा करण्यात आली होती. एनएसएबी महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेला (एनएससी) सल्ला देईल असा निर्णयही घेण्यात आला. 2018 मध्ये पुन्हा एकदा हे मंडळ स्थापन करण्यात आले. त्यानंतर रशियामध्ये भारताचे राजदूत असलेले पी.एस. राघवन यांना त्याचे प्रमुख बनवण्यात आले.
पाकिस्तानचे मंत्री म्हणाले, भारत 36 तासांत हल्ला करू शकतो
दरम्यान, पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी दावा केला होता की भारत येत्या 24-36 तासांत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो. तरार म्हणाले की पहलगाम घटनेच्या निमित्ताने भारत हे करू शकतो अशी विश्वसनीय गुप्तचर माहिती त्यांना मिळाली आहे. ते म्हणाले की पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी आहे आणि या संकटाचे दुःख त्यांना खरोखर समजते. आम्ही नेहमीच जगात त्याचा निषेध केला आहे. पुढे असेही सांगण्यात आले की जर भारताने कोणताही लष्करी हल्ला केला तर पाकिस्तान त्याला निश्चित आणि कडक प्रत्युत्तर देईल. ते म्हणाले की आम्ही कोणत्याही किंमतीत पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करू.
इतर महत्वाच्या बातम्या
















