एक्स्प्लोर
INDvAUS 3rd ODI: 'प्रतिष्ठा राखली'! Rohit Sharma चे शतक, Virat Kohli चे अर्धशतक; भारताचा दणदणीत विजय.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात Rohit Sharma आणि Virat Kohli च्या दमदार खेळीने भारताने ९ गडी राखून विजय मिळवला. सलामीला आलेल्या रोहित शर्मानं (Rohit Sharma) वनडे क्रिकेटमधील आपलं तेहेतीस वं शतक साजरं केलं. त्याने १२५ चेंडूंमध्ये नाबाद १२१ धावा केल्या, तर विराटने (Virat Kohli) नाबाद ७४ धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६८ धावांची अभेद्य भागीदारी साकारली. सिडनी येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २३७ धावांचे आव्हान ठेवले होते, जे भारताने ३८.३ षटकांत पूर्ण केले. या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिले दोन्ही सामने जिंकून आघाडी घेतली होती, मात्र भारतानं हा तिसरा सामना जिंकून प्रतिष्ठा राखली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















