एक्स्प्लोर

Gopal Badne : मोठी बातमी, फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस स्टेशनला हजर

Phaltan Crime : फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित PSI गोपाळ बदने स्वत: फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

सातारा :  फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने (Gopal Badne Surrender)  फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली होती. मात्र, स्वत: गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर पीएसआय गोपाळ बदने यानं चारवेळा बलात्कार केल्याचं लिहिलं होतं. यामुळं मोठी खळबळ उडाली होती.... 

गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात

PSI गोपाळ बदने याच्या नावाचा उल्लेख फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केल्यानंतर तिच्या हातावरील नोटमध्ये होता. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर पीएसआय गोपाळ बदने याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची माहिती समोर येताच पीएसआय गोपाळ बदने फरार झाला होता. त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळल्यानं पोलिसांची पथकं पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली होती. तर, सातारा पोलिसांची पथकं पुणे जिल्ह्यात देखील रवाना झाली होती. 

प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी 

डॉक्टर महिलेच्या हातावर पीएसआय गोपाळ बदने याच्यासह प्रशांत बनकर याचं नाव देखील होती. प्रशांत बनकर यानं चार महिन्यांपासून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं नोटमध्ये म्हटलं होतं. प्रशांत बनकर देखील ही घटना समोर आल्यानंतर फरार झाला होता. प्रशांत बनकर याला फलटण पोलिसांनी पुण्यातून अटक केली होती. त्यानंतर प्रशांत बनकर याला फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाकडून प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. 

दरम्यान, फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी मंत्री पंकजा मुंडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.पंकजा मुंडेंनी मृत डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांची मूळ गावी भेट घेतली. डॉक्टर तरुणीला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. 

दरम्यान, निलंबित PSI गोपाळ बदने फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला असून आता पोलिसांकडून पुढील कार्यवाही काय केली जाते ते पाहावं लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget