Jerusalem Wildfire Fire Video : इस्त्रायलमधील देवभूमीला भयंकर आगीने वेढलं; हायवेवरही आगीचे लोळ, लोकांनी वाहने रस्त्यावर सोडून पळ काढला, लष्कराला पाचारण
Jerusalem Wildfire Fire Video : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सैन्य तैनात केले आहे. याशिवाय अनेक निवासी भागातून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

Jerusalem Wildfire Fire Video : इस्रायलच्या जेरुसलेम शहराच्या बाहेरील भागात बुधवारी आग लागली. एश्ताओलच्या जंगलात ही आग लागली, जी वेगाने पसरत आहे. अनेक रस्त्यांसह महामार्ग सुद्धा आगीच्या विळख्यात आले आहेत, ज्यामुळे लोकांना त्यांची वाहने रस्त्यावर सोडून पळून जावे लागले आहे. आग विझविण्यासाठी 63 अग्निशमन दल आणि 11 विमाने तैनात करण्यात आली आहेत. जोरदार वारे आणि तीव्र उष्णतेमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे.
Over the past few hours, wildfires have been blazing across the Jerusalem hills and coastal plain. The flames have reached the Latrun Armored Corps Monument, causing the cancellation of the Memorial Day ceremony.
— Israel National News - Arutz Sheva (@ArutzSheva_En) April 30, 2025
🎥Jerusalem Fire and Rescue pic.twitter.com/6D0hp7cRgF
किमान पाच ठिकाणी आग पसरली
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने सैन्य तैनात केले आहे. याशिवाय अनेक निवासी भागातून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, ही आग किमान पाच ठिकाणी पसरली आहे.
BREAKING:
— Chaim • חיים (@ChaimSmierc) April 30, 2025
The fires in the Jerusalem area are now a national emergency.
- 6 different focal points of the fire.
- Route 1 has been closed.
- At least 60 population centers have been evacuated.
- At least 7 light injuries so far.
- Fires are rampant in Park Canada and the… pic.twitter.com/AbixJw9ont
जेरुसलेम ते तेल अवीव महामार्ग बंद
जेरुसलेम ते राजधानी तेल अवीव हा महामार्ग क्रमांक 1 बंद करण्यात आला आहे. दोन्ही शहरांमधील रेल्वे वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे. एश्ताओल परिसरात कमांड सेंटर उभारण्यात आले आहे. सरकारचे दोन मंत्रीही कमांड सेंटरमध्ये जात आहेत.
⚡️BREAKING:
— S2FUncensored (@S2FUncensored) April 30, 2025
Massive fires in Jerusalem, Israel requests assistance from neighboring countries to extinguish the fires. pic.twitter.com/E7zsRyAzvy
आगीचा भडका कुठं उडाला?
पूर्व जेरुसलेमच्या माउंट स्कोपस भागात आगीची सुरुवात झाली, इसावियापासून सुरू होऊन ती दक्षिणेकडे पसरली. आगीच्या ज्वाळा जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाजवळील भागात, हदासाह माउंट स्कोपस रुग्णालयाजवळील आणि ओफ्रिट लष्करी तळाजवळ पोहोचल्या.
🚨⚡️BREAKING:
— War Analysis (@iiamguri9) April 30, 2025
New footage of fires raging in Jerusalem shows the Israeli forces failing to fully control them so far. https://t.co/ewInTPeCWN pic.twitter.com/UdLsoyjuVk
किती संस्थांवर परिणाम झाला?
या आगीमुळे जेरुसलेमच्या व्हॅली ऑफ द क्रॉसमधील इस्रायल संग्रहालय रिकामे करावे लागले. इमारतीच्या छताला नुकसान झाले असले तरी, कोणत्याही पुरातत्वीय किंवा कलात्मक कलाकृतींना नुकसान झाले नाही.
स्थलांतर आणि धोक्यात आलेले क्षेत्र
किर्यात येरिम, त्झोवा, ईन राफा, ईन नाकुबा, शोएवा, शोरेश आणि हर एतानसह सताफ वनक्षेत्राजवळील आणि मार्ग 1 वरील अनेक शहरे आणि गावे रिकामी करण्यात आली. खबरदारी म्हणून एतानिम मनोरुग्णालय देखील रिकामे करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या
























