एक्स्प्लोर

GST Registration : 1 नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार, फक्त 3 दिवसात मंजुरी मिळणार, निर्मला सीतारामन यांची माहिती

GST Registration: केंद्र सरकारकडून 1 नोव्हेंबरला जीएसटी नोंदणीसाठी नवी आणि सोपी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. ज्यानुसार 3 दिवसांमध्ये मंजुरी मिळेल.  

New GST Registration Process 2025 नवी दिल्ली: केंद्र सरकारनं 1 नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रणालीनुसार जीएसटी नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर फक्त कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसांमध्ये मंजुरी मिळेल. सरकारद्वारे आणललेल्या जीएसटी सुधारणांतर्गत जीएसटी परिषदेनं याला मंजुरी दिली आहे.  

नव्या नोंदणी प्रक्रियेत पहिल्यापेक्षा आणि अधिक सोपी होईल आणि मानवी हस्तक्षेप कमी होईल. नव्या व्यवस्थेनुसार दोन प्रकारच्या अर्जांना स्वयंचलित पद्धतीनं नोंदणी मिळेल. पहिले म्हणजे जे लोक ज्यांना सिस्टीमनं डेटा आणि जोखीम विश्लेषणच्या आधारावर निवडलेलं असेल. दुसरा प्रकार ज्यांचा आऊटपुट टॅक्स दरमहा 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या मते, नव्या प्रक्रियेनुसार जवळपास 96 टक्के नव्या अर्जदारांना याचा थेट फायदा होईल. गाझियाबादमध्ये नव्या सीजीएसटी भवनाचं उद्घाटन केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की  सरकारचं लक्ष आता नवं धोरण बनवण्याऐवजी स्थानिक स्तरावर धोरणांच्या योग्य प्रकारच्या अंमलबजावणीवर केंद्रीत होत आहे. यासह अर्थमंत्री सीतारामन  यांनी राज्य आणि केंद्रीय जीएसटी कार्यालयांना आवाहन केलं की त्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता नव्या धोरणांनुसार काम करावं आणि नव्या नियमांना लागू करावं. यासह त्या म्हणाल्या की प्रशासनाला करदात्यांबद्दल सन्मानाची भावना ठेवावी. त्याचवेळी करचोरी विरुद्ध कठोर पावलं उचलली पाहिजेत. 

निर्मला सीतारामन म्हणाल्या की प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सोपी बनवली आहे. ज्यामुळं स्वंयचलित रिफंड आणि जोखीम आधारित ऑडिट सिस्टीमची सुरुवात केली आहे. याशिवाय देशभरात जीएसटी सेवा केंद्रात पुरेशा संख्येनं कर्मचारी असण्यावर देखील भर दिला. ज्यामुळं सामान्य नागरिकांची जीएसटी संदर्भातील समस्यांची सोडवणूक सहजपणे होईल, असं त्या म्हणाल्या. याशिवाय त्यांनी म्हटलं की जीएसटी केंद्रात करदात्यांच्या मदतीसाठी हेल्पडेस्क असला पाहिजे.  

महत्त्वाच्या बातम्या

बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पुढील आठवड्यात चार दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Vidyadhar Joshi: Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Old Monk अचानक बाजारातून गायब, मराठी अभिनेत्यासह सोशल मीडियावर अनेकांचे सवाल, नेमकं कारण काय?
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Investment Plan : फक्त 15 वर्षांत गुंतवणूक करा, तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी उभारा, नेमकी काय आहे योजना? 
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु
बँक ऑफ महाराष्ट्रकडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 2020 कोटींवर, शेअरमध्ये तेजी सुरु

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Dive Ghat Video: झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; पाहा 5 VIDEO
झाला देव वारकरी...बघं वारी आली दारी; दिवे घाटातील आयुष्यभर हृदयात जपून ठेवणारा क्षण; 5 VIDEO
Pune Moshi Building Collapse: तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 81 तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन अखेर पूर्ण, मृतांची संख्या 9 वर, सुदैवाने 14 कामगार बचावले; मोशी दुर्घटनेत आतापर्यंत काय काय घडलं?
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Embed widget