अमेरिकेच्या ओशकोश डिफेन्सने लष्कर आणि नौदलासाठी तयार केले इलेक्ट्रिक वाहन, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत मजबूत
ओशकोश डिफेन्सने अमेरिकेत एक इलेक्ट्रिक वाहन तयार केले आहे. सायलेंट ड्राइव्ह हायब्रीड-इलेक्ट्रिक जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हेईकल (EJLTV) असे या वाहनाचे नाव आहे.
Electric vehicle eJLTV : सध्या जगभरात इलेक्ट्रिक वाहन वापरण्यावर भर दिला जात आहे. मोठ्या प्रमाणावर लोक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत आहेत. फक्त रस्त्यावरुनच चालणारी नाही तर पाणी आणि हवेमधून चालणारी इलेक्ट्रिक वाहने तयार होत आहेत. लष्करासाठी सुद्धा अशा प्रकारची इलेक्ट्रिक वाहने तयार केली जात आहेत. ओशकोश डिफेन्सने अमेरिकेत एक इलेक्ट्रिक वाहन तयार केले आहे. सायलेंट ड्राइव्ह हायब्रीड-इलेक्ट्रिक जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हेईकल (EJLTV) असे या वाहनाचे नाव आहे. ओशकोशने यापूर्वीच अमेरिकन सशस्त्र दलांना अनेक वाहने उपलब्ध करून दिली आहेत. परंतू हे नवीन वाहन कार्यक्षमता आणि सुरक्षितता या दोन्ही बाबतीत अधिक मजबूत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय ही नवीन वाहने इंधनाच्या बाबतीतही किफायतशीर ठरणार आहेत. विशेष म्हणजे हे वाहन केवळ 30 मिनीटात चार्ज होणार आहे.
संरक्षण हे संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जगातील प्रत्येक देश आपली संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. आपले सैन्य आणि मरीन कॉर्प्स बळकट करण्यासाठी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने प्रथमच सायलेंट ड्राइव्ह हायब्रीड-इलेक्ट्रिक जॉइंट लाइट टॅक्टिकल व्हेईकल (eJLTV) वाहनाचा वापर करत आहे. हे वाहनाचा वापर जनरेटर म्हणूनही करता येणार आहे.
हे eJLTV ओशकोश डिफेन्सद्वारे उत्पादित केले आहे. जी ओशकोश कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ओशकोश कॉर्पोरेशन ऑटोमोटिव्ह आणि शस्त्रास्त्रे तयार करण्यात माहिर आहे. ही कंपनी जगभरात त्यांच्या सेवा देते. eJLTV त्यांच्या नियमित मोड (इंधनावर) व्यतिरिक्त विजेवर (सायलेंट ड्राइव्ह मोड) 30 मिनिटांच्या कालावधीसाठी ऑपरेट केले जाऊ शकते. वाहन वापरात असताना लिथियम-आयन बॅटरी 30 मिनिटांच्या कालावधीत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते. याचा अर्थ वाहनासाठी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता नाही. हे वाहन 115 किलोवॅटपर्यंत वीज निर्माण करण्यास सक्षम असणार आहे. जनरेटर म्हणून वापरता येईल. तसेच eJLTV मधील बॅटरीची क्षमता 30 किलोवॅट तास असण्याची अपेक्षा आहे. ती 10 वर्षांच्या कालावधीसाठी वापरली जाऊ शकते.
eJLTV या वाहनाचे वजन हे 1000 पाउंड आहे. यामुळे भौतिक परिमाणे आणि वाहतूकक्षमता प्रभावित होणार नसल्याचे ओशकोश डिफेन्सने स्पष्ट केले आहे. eJLTV च्या इतर महत्त्वाच्या वैशिष्यांपैकी एक म्हणजे ते 20 टक्क्यांहून अधिक वाढीव इंधन देते. जरी Oshkosh eJLTV एक उपयुक्ततावादी संरक्षण वाहन आहे. कंपनीने 25 जानेवारी रोजी या वाहनाचे अनावरण केले आहे.