एक्स्प्लोर

गाई-मेंढ्यांनी ढेकर दिल्यास शेतकऱ्यांना भुर्दंड; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Tax On Farmers : शेतकऱ्यांना गाई, मेंढ्यांनी ढेकर दिल्यास कर भरावा लागणार आहे. न्यूझीलंड सरकारकडून याबाबतचे एक विधेयक तयार करण्यात येत आहे.

Tax On Farmers : पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याासाठी अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. काही देशांकडून कायदेही तयार केले जात आहेत. सध्या न्यूझीलंड सरकार तयार करत असलेला कायदा चर्चेत आला आहे. कृषी क्षेत्रातून निर्माण होणाऱ्या ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. न्यूझीलंड सरकारच्या प्रस्तावित कायद्यानुसार, गाईने ढेकर दिल्यास शेतकऱ्याकडून पैसे वसूल करण्यात येणार आहे. पशूंच्या माध्यमातून होणाऱ्या उत्सर्जनासाठी शेतकऱ्यांना कर द्यावा लागणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश होणार असल्याचे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंड हा मोठा कृषी उत्पन्नांचा मोठा निर्यातदार देश आहे. न्यूझीलंडमध्ये माणसांपेक्षा पशूंची संख्या अधिक आहे. जवळपास 50 लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये एक कोटी गुरे आणि 2.6 कोटी शेळी-मेंढ्या आहेत. देशात होणारे निम्मे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन हे कृषी क्षेत्रातून तयार होते. यामध्ये मुख्यत: मिथेन वायूचा समावेश आहे. सरकार आणि कृषी क्षेत्राशी संबंधितांनी तयार केलेल्या या विधेयकानुसार शेतकऱ्यांना 2025 पासून  वायू उत्सर्जनासाठी रक्कम द्यावी लागणार आहे. 

मोठ्या आणि लहान आकाराच्या फार्म गॅसची किंमत वेगवेगळी असणार आहे. मात्र, त्याचे प्रमाण एकाच पद्धतीने मोजले जाणार आहे. न्यूझीलंडचे हवामान बदल मंत्री जेम्स शॉ यांनी म्हटले की, वातावरणातील मिथेनचे प्रमाण कमी करावे लागणार आहे. त्यासाठी शक्य ती पावले उचलली जाणार आहेत. यामध्ये Effective Emissions Pricing System महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

शेतकऱ्यांना प्रोत्साहन 

विधेयकानुसार, वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे.  शेतकऱ्यांकडून होणाऱ्या उत्सर्जनाची भरपाई जंगले लावून केली जाऊ शकते. या योजनेतील करातून येणारा पैसा हा शेतकऱ्यांसाठी संशोधन, विकास आणि सल्लागार सेवांमध्ये गुंतवला जाणार आहे. वर्ष 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करण्याचे लक्ष्य न्यूझीलंड सरकारने ठेवले आहे. कृषी क्षेत्रातून वायू उत्सर्जन कमी करण्याचे धोरण या वर्षाच्या अखेरपर्यंत ठरवण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 04 December 2024 ABP MajhaEknath Shinde on Ajit Pawar : दादा को अनुभव हैं..सुबह-शाम शपथ लेनेकी, शिंदेंनी तुफान हसवलंMahayuti Full PC : शिदेंची नाराजी, दादांची फटकेबाजी; दोघांनी फडणवीसांना तुफान हसवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Embed widget