New York Plane Accident : विमानतळावर भीषण अपघात; दोन विमानांची जोरदार धडक, एकाचं नाक तर दुसऱ्याचं पंख तुटलं!
New York Plane Accident : न्यूयॉर्कमध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. एका विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांना धडकली.

New York Plane Accident : अमेरिकेतील (America) न्यूयॉर्क (New York) शहरात एक मोठा विमान अपघात (Plane Accident) झाला आहे. बुधवारी (1 ऑक्टोबर) रात्री लागार्डिया विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांवर धडकली. ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाईन्सची (Delta Airlines) होती आणि या अपघातात दोन्ही विमानांचे मोठे नुकसान झाले आहे.
डेल्टा एअरलाईन्सचे एक विमान गेटच्या दिशेने जात असताना, दुसरे विमान लँडिंगनंतर गेटकडे येत होते, त्याच वेळी हा भीषण अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की, एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या नाकावर आदळला आणि त्या धडकेत पंख तुटून खाली पडला. पायलटने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला, पण अपघात टळला नाही. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
BREAKING: Two Delta planes have collided while taxiing at LaGuardia Airport in New York City, with a wing of one of the planes detached, reports said.
— AZ Intel (@AZ_Intel_) October 2, 2025
"They were taxing to the gate at LGA after landing at CLT when they were struck by another Delta regional jet that was taxiing… pic.twitter.com/eHj9HZ7gnV
न्यूयॉर्कमध्ये याआधीही विमान अपघात (New York Plane Accident)
न्यूयॉर्कमध्ये याआधीही अनेक वेळा विमान अपघात झाले आहेत. नोव्हेंबर 2001 मध्ये, टेकऑफदरम्यान एका विमानाचा अपघात झाला होता, ज्यात सुमारे 260 लोकांचा मृत्यू झाला होता. जानेवारी 2009 मध्ये, एका विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले होते. त्यावेळे पायलटने अत्यंत धाडसी निर्णय घेत ते विमान हडसन नदीमध्ये सुरक्षित उतरवले होते.
अहमदाबादमध्येही झाला होता मोठा विमान अपघात (Gujarat Air India Plane Crash)
गुजरातच्या अहमदाबाद शहरातही 12 जून 2025 रोजी एक मोठा विमान अपघात झाला होता. या वेळी एअर इंडियाचे एक विमान क्रॅश झाले होते. या अपघातात 241 लोकांचा मृत्यू झाला होता. विमानात एकूण 242 प्रवासी होते, केवळ एकच व्यक्ती अपघातातून बचावली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या























