एक्स्प्लोर

Namibia Cull: देशातील नागरिकांची भूक भागवण्यासाठी 723 जंगली प्राण्यांचा बळी देणार; नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार

Namibia drought: नामिबियात मोठा दुष्काळ पडल्याने लोकांना खाण्यासाठी अन्नपाणी उरलेले नाही. त्यामुळे आता वन्यप्राण्यांचे मांस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आतापर्यंत 150 जंगली प्राण्यांना ठार मारण्यात आले आहे.

विंडहोक: नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल 723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ (Drought) पडला आहे. त्यामुळे देशात नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील सरकारने (Namibia) देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती (Elephants), पाणघोडे यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे.

कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला, 100 रानगवे, 300 झेब्रा (Zebra), 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे. आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची (Wild Animals) कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे.

या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, मांसासाठी प्राण्यांची कत्तल करणे आवश्यक आहे. हे आमच्या संविधानाला धरुन आहे. संविधानानुसार नामिबियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नागरिकांचा प्रथम हक्क आहे. 

नामिबियात ही परिस्थिती का ओढवली?

नामिबिया हा आफ्रिका खंडातील दक्षिण टोकाला असणारा देश आहे. हा भाग कायमच दुष्काळप्रवण राहिलेला आहे. मात्र, यंदा इथे गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. यापूर्वी नामिबियात 2013, 2016, 2019 मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. मात्र, यंदाचा दुष्काळ हा अधिक व्यापक आणि भीषण आहे. या दुष्काळाची सुरुवात ऑक्टोबर 2023 मध्ये बोटसवाना येथे झाली. त्यानंतर अँगोला, झाम्बिया,  झिम्बाम्ब्वे आणि नामिबिया या देशांमध्येही दुष्काळ पडला. एल निनो वाऱ्यांमुळे येथील वातावरणात मोठे बदल झाले होते. या भागात प्रचंड उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. या भागात वर्षाला होणाऱ्या एकूण पावसाच्या निम्मा पाऊसच पडला आहे. या भीषण दुष्काळामुळे शेतातील पिके वाळून गेली.  नामिबियातील नागरिक आणि जनावारांना खाण्यासाठी काही उरलेले नाही. त्यामुळे देशातील पाळीव प्राणी अन्नपाण्याअभावी तडफडून मेले आहेत.

त्यामुळे आता येथील सरकारने देशातील नागरिकांना अन्न पुरवण्यासाठी आपला मोर्च वन्यप्राण्यांकडे वळवला आहे. त्यामुळे आता हत्ती, पाणघोडे, झेब्रे आणि रानगव्यांची मोठ्याप्रमाणावर कत्तल केली जाणार आहे. या प्राण्यांची कत्तल केल्याने खाण्यासाठी मांस उपलब्ध होण्यासोबतच अनेक ठिकाणी प्राणी आणि वन्यजीवांमध्ये अन्नपाण्यासाठी होणारा संघर्ष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील मजकूर सध्या जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, आतापर्यंत कोणीही त्यामध्ये हस्तक्षेप करुन नामिबियाला मदत करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही.

आणखी वाचा

बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांना माहेरघरीच सासुरवास, वन्यप्राणी उपचार केंद्राच्या प्रतीक्षेत 

मानव आणि वन्यप्राणी संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस बिकट! अहवालातील कटू सत्य... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 10 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSangli : Sanjay Kaka Patil यांना अजित घोरपडे गटाचा पाठिंबा, दादांकडून घोरपडेंना आमदारकीचं आश्वासनUlema on MVA | उलेमा बोर्डाचा मविआला पाठिंबा, राज्यातील राजकारण तापलं! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha election 2024:बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
बीडच्या सभेत संदीप क्षीरसागर थेटच म्हणाले, 'आता कसं जरांगे दादा पाटील म्हणतील तसं..'
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नाही, BCCI ची घोषणा; पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया!
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Dhananjay Mahadik on Ladki Bahin | मी महिलांना कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही - धनंजय महाडिक
Thackeray 2 : ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
ठाकरे 2 चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीच्या ताब्यात, संजय राऊतांचा मोठा खुलासा
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
साताऱ्यात पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमची थोडीफार इज्जत राहिली; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा!
Satej Patil: महिलांची व्यवस्था करतो, याचा अर्थ काय? धनंजय महाडिकांच्या लाडकी बहीण योजनेबाबतच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
धनंजय महाडिकांची लाडक्या बहि‍णींना धमकी, महिला मतदानातून याचं उत्तर देतील; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar : शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांची भेटी झालेली आहे, याचा शोध घेतला पाहिजे; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Pune News : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण, विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी
Embed widget