(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mysterious Ball : दुसऱ्या ग्रहावरून आली आहे 'ही' रहस्यमयी वस्तू? समुद्र किनाऱ्यावर सापडली विचित्र गोष्ट; यामागचं गूढ काय?
Ball Washes Out on Beach : ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर एक रहस्यमयी वस्तू सापडली असून सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे.
Mysterious Ball Found : ऑस्ट्रेलिया (Australia) तील समुद्रकिनाऱ्यावर एक विचित्र आणि रहस्यमयी वस्तू (Mysterious Object) सापडली आहे. सोशल मीडियावर या रहस्यमयी वस्तूचे फोटो व्हायरल झाले असून या रहस्यमयी वस्तूमागचं गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनाऱ्यावर एका व्यक्तीला एक गोल आकाराची विचित्र गोष्ट सापडली. समुद्राच्या किनाऱ्यावर या व्यक्तीला एक जड धातूचा गोळा आढून आला. हा धातूचा गोळा किनाऱ्यावर वाहून आला होता. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की , "पहिल्यांदा ही वस्तू पाहिल्यानंतर मला कळले की, हा धातूचा गोळा कधीकाळी खूप उच्च तापमानावर तापवण्यात आला असावा आणि कदाचित तो दुसऱ्या जगातून आला असावा."
जगात अद्यापही काही रहस्यांवरून पडदा उलगडलेला नाही. अनेक रहस्य दडलेली असून त्यामागचं सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक वेळा आपल्याला काही अशा गोष्टी दिसतात ज्यांचे अस्तित्व समजणं फार कठीण होते. अशा गोष्टी आणि घटना इतर ग्रहाशी किंवा एलियनशी जोडल्या जातात. अशीच एक वस्तू ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका व्यक्तीला आढळली आहे. फिल मॉरिस नावाच्या व्यक्तीला क्वीन्सलँडमधील समुद्रकिनाऱ्यावर एक धातूची गोल आकाराची रहस्यमयी वस्तू आढळून आली आहे.
दुसऱ्या ग्रहावरून आली आहे ही वस्तू?
ही वस्तू पाहून हा व्यक्तीही आश्चर्यचकित झाला. या व्यक्तीला आधी वाटले की, ही वस्तू मानवरहित रॉकेटचा तुकडा असू शकतो. पण, फोटोवरून आणि अनेक तास शोध घेतल्यानंतर, या व्यक्तीवा आढळलं की, अशीच एक वस्तू नामिबियामध्ये आढळली होती. एका दशकापूर्वी म्हणजे सुमारे 10 वर्षापूर्वी नामिबियामध्ये यासारखाच दिसणारा एक धातूचा गोळा सापडला होता. नामिबियातील रहस्यमयी वस्तंचे व्हायरल फोटो पाहिल्यानंतर या व्यक्तीने दावा केला आहे की, हा गोळा अगदी पूर्वी आढळलेल्या गोळ्याप्रमाणेच आहे. मॉरिसने म्हटलं आहे की, हा गोळा दुसऱ्या जगातून किंवा दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या चेंडूप्रमाणे वाटतो.
धातूच्या गोळ्याचा एलियनशी संबंध?
या रहस्यमयी धातूच्या गोळ्याच्या उत्पत्तीविषयी कोणतीही माहिती नसल्याने लोकांनी या वस्तूपासून दूर राहावे, असे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. काही लोकांच्या मते, ही दुसर्या ग्रहावरील वस्तू आहे. या धातूच्या गोळ्याचा एलियनशी संबंध असल्याचा दावा काही जणांनी केला आहे, तर अनेकांनी हा मानवनिर्मित असल्याचं म्हटलं आहे.
याहूशी बोलताना मॉरिसने म्हटलं आहे की, "हा बॉल पाहून मला कळलं होतं की, हा धातूचा गोळा एकेकाळी खूप गरम झाला असावा. मला विश्वास आहे की, तो गोळा समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्यापूर्वी कुठेतरी समुद्रात कोसळला होता, असा दावा त्याने केला आहे.
याआधीही सापडली होती रहस्यमयी वस्तू
ही पहिलीच घटना नाही, तर जुलैमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलियातील ग्रीन हेड बीचजवळ दोन मीटर लांब आणि रुंद सिलेंडर किनाऱ्यावर वाहून गेला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सीने या शोधाची दखल घेतली होती.