Coronavirus Today : देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Today : देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यूदेशाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के तर रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला.
![Coronavirus Today : देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यू coronavirus india Update reports 38 164 new covid 19 cases 499 deaths in 24 hours Coronavirus Today : देशात 24 तासांत 38 हजार 164 नवे कोरोनाबाधित, तर 499 रुग्णांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/19/a65bfce42bb5edb7375260002b9a00c1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus Today : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. गेल्या 24 तासांत 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 38 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 499 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 14 हजार 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच देशात सध्या 4 लाख 21 हजार 665 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत तीन कोटी 8 हजार 456 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या तीन कोटी 11 लाख 44 लाख 229 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 2.61 टक्के आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 28 दिवसांपासून 3 टक्क्यांहून कमी झाला आहे. तर रिकव्हरी रेट 97.32 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात रविवारी नऊ हजार रुग्णांची भर तर 5, 756 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. काल 9 हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 80 हजार 350 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के आहे.
राज्यात काल (रविवारी) 180 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 3 हजार 486 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (23), गोंदिया (68), चंद्रपूर (45) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 414 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
भिवंडी, नांदेड, भंडारा, जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 2052 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,54,81,252 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,14, 190 (13.66 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,67,585व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,066 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus India : जुलैच्या दोन आठवड्यांत कोरोनाच्या आकडेवारीत घट नाही, प्रादुर्भाव 'जैसे थे'; काय म्हणतात आकडे?
- Third Wave Covid 19 : कोरोनाची तिसरी लाट भारतात आली आहे का? आकडे काय सांगतात?
- Coronavirus : येणारे तीन-चार महिने अत्यंत महत्वाचे; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा
- तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्राचं मिशन 100 डेज कसं असेल?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)