एक्स्प्लोर

नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचं आधीच माहित, परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

लंडनमध्ये ऐशोआरामात राहत असलेल्या नीरव मोदीने ऑस्ट्रीच हाइड कंपनीचं महागडे जॅकेट परिधान केलं होतं. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा लाख रुपये इतकी आहे. लंडनमध्ये 'द टेलिग्राफ, यूके' या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर न देताच नीरव मोदी टॅक्सी पकडून निघून गेला.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदी हा लंडनमध्येच राहत असल्याचं भारत सरकारला आधीच माहित होतं, असा दावा परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी ईडी आणि सीबीआयच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाने अर्ज केला आहे. यूके सरकारला ऑगस्ट 2018 मध्येच अर्ज करण्यात आला होता. परंतु हा अर्ज विचाराधीन असून त्याव्यतिरिक्त कोणतीही माहिती नसल्याचं रवीश कुमार यांनी सांगितलं. केंद्र सरकार नीरव मोदीच्या बाबतीत काहीच करत नसल्याचं मानणं चुकीचं आहे. नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी जी पावलं उचलावी लागतील, ती करण्याची आमची तयारी आहे, हा विश्वास बाळगण्याचं आवाहनही रवीश यांनी केलं. नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला उद्ध्वस्त केला असतानाच परदेशात मात्र त्याचा मुक्त संचार असल्याचं समोर आलं आहे. भारतातून पोबारा करुन गेलेला नीरव मोदी लंडनमध्ये बिनबोभाटपणे वावरत आहे. 'द टेलिग्राफ' या लंडनमधील वृत्तपत्राने याबाबत दावा केला आहे. नीरव मोदी वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका अलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचं 'टेलिग्राफ,यूके'च्या वृत्तात म्हटलं आहे. सेंटर पॉईंट टॉवरमध्ये थ्री बीएचके फ्लॅटमध्ये नीरवचं वास्तव्य असल्याचा दावा केला जात आहे. लंडनमधील रस्त्यावर वेगळ्याच लूकमध्ये नीरव फिरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. लंडनमध्ये ऐशोआरामात राहत असलेल्या नीरव मोदीने ऑस्ट्रीच हाइड कंपनीचं महागडे जॅकेट परिधान केलं होतं. या जॅकेटची किंमत कमीत कमी दहा लाख रुपये इतकी आहे. लंडनमध्ये 'द टेलिग्राफ, यूके' या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर न देताच नीरव मोदी टॅक्सी पकडून निघून गेला. नीरव मोदीने भारतातून कर्ज बुडवून पसार झालेला दुसरा आरोपी विजय मल्ल्याची भेट घेतल्याची माहिती आहे. गेल्या दहा महिन्यात हे दोघे अनेकवेळा लंडनमध्ये भेटल्याचीही माहिती आहे. यावेळी प्रत्यार्पणाबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याचंही म्हटलं जातं. शिवाय मल्ल्याचे वकीलच नीरव मोदीची केस लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. VIDEO | हजारो कोटींचा घोटाळेबाज नीरव मोदी लंडनमध्येच इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत नीरवच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही. नीरव मोदी हा 13 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचा फरार आरोपी आहे. त्याचा अलिबागच्या समुद्रकिनारी वसलेला अलिशान बंगला सरकारने काल स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त केला. 110 डायनामाईट, 30 किलो स्फोटकांद्वारे 30 हजार चौरस फुटांच्या क्षेत्रात पसरलेला हा बंगला जमीनदोस्त केला. 50 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा हा बंगला पाडल्यानंतर ईडी तिथल्या जमिनीचा लिलाव करेल, जेणेकरुन बँकांना झालेल्या नुकसानाची भरपाई होईल. नियम धाब्यावर बसवून 1985 मध्ये हा बंगला बांधण्या आला होता.  

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
अमेरिकन सैन्याला ठार मारा, 30 हजार डॉलर्स मिळवा, इराणकडून बक्षीस जाहीर, महिलांसाठी बक्षिसाची रक्कम दुप्पट 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
घराचं काम सुरु असताना हाती लागला सोन्याचा खजिना, किंमत तब्बल 99 कोटी रुपये, सापडलेले सोने नेमके कोणाचे? 
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget