एक्स्प्लोर

Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे

Sri Lanka Presidential Elections : डाव्या विचारसरणीचे नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) नेते अनुरा कुमारा दिसानायके (Anura Kumara Dissanayake) राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Sri Lanka Presidential Elections : देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्प्यावर श्रीलंकेत  (Sri Lanka presidential elections) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू आहे. डाव्या विचारसरणीचे नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) नेते अनुरा कुमारा दिसानायके (Anura Kumara Dissanayake) राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मुख्य विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा हे ट्रेंडमध्ये मागे आहेत.आज (22 सप्टेंबर) सकाळी जाहीर झालेल्या ताज्या निवडणूक निकालांनुसार, अनुरा कुमारा दिसानायके यांना 42 टक्के मते मिळाली आहेत. श्रीलंकेत उमेदवाराला विजयी होण्यासाठी 51 टक्के मतांची आवश्यकता असते. आतापर्यंत मिळालेल्या निवडणूक निकालांमध्ये विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांना सुमारे 32 टक्के  मते मिळाली असून ते दुसऱ्या स्थानावर आहेत. राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे, जे दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवत आहेत, त्यांना आतापर्यंत 16 टक्के मते मिळाली आहेत, तर पदच्युत राष्ट्रपतींचे पुतणे नमल राजपक्षे यांना अवघी 3 टक्के मते मिळाली आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जवळपास 75 टक्के मतदान

श्रीलंकेत, मतमोजणीच्या पहिल्या फेरीत उमेदवाराला 51 टक्के मते मिळाली नाहीत, तर राष्ट्रपती पदासाठी मतदारांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडीच्या आधारे दुसऱ्या फेरीतील मतांची मोजणी केली जाईल. 2022 च्या उठावानंतर श्रीलंकेच्या पहिल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शनिवारी जवळपास 75 टक्के मतदान झाले. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले होते. मतदान आणि मतमोजणी सुरू झाल्यानंतर लगेचच देशभर कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 

दिसानायके विजयी होण्याची शक्यता

विश्लेषकांचे म्हणणे आहे की दिसानायके 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने अध्यक्षपदी विजयी होण्याची शक्यता आहे. अनुरा दिसानायके यांना चीन समर्थक मानले जाते. अध्यक्ष झाल्यानंतर अदानींचा प्रकल्प रद्द करू, असे आश्वासन अनुरा यांनी दिले आहे. निवडणुकीपूर्वी नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात सुद्धा अनुरा कुमारा दिसानायके विजयी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

दिसानायके यांना अभिनंदनाचे मेसेज येऊ लागले

श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी 'एक्स' वर लिहिले आहे की, सुरुवातीचे निकाल दिसानायके यांच्या विजयाकडे स्पष्टपणे संकेत देत आहेत. ते म्हणाले, "मी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला असला तरी, श्रीलंकेच्या जनतेने त्यांचा निर्णय घेतला आहे आणि मी अनुरा कुमारा दिसानायके यांच्यासाठी दिलेल्या आदेशाचा पूर्ण आदर करतो." प्रेमदासा यांचे समर्थन करणारे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी दिसानायके यांना फोन केला होता. संसदेत कोलंबोचे प्रतिनिधित्व करणारे डी सिल्वा म्हणाले, "आम्ही प्रेमदासा यांच्यासाठी खूप मेहनत घेतली, पण तसे होऊ शकले नाही. दिसानायके हेच श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती असतील हे आता स्पष्ट झाले आहे." प्रेमदासा यांचे आणखी एक समर्थक आणि तमिळ नॅशनल अलायन्स (TNA) चे प्रवक्ते एमए सुमंथिरन यांच्या मते, दिसानायके यांनी वांशिक किंवा धार्मिक कट्टरतेचा अवलंब न करता प्रभावी विजय मिळवला आहे. 

अनुरांची भारतासोबत मैत्री वाढली

अनुरा कुमारा दिसानायके डाव्या पक्षाच्या जनता विमुक्ती पेरामुना (JVP) च्या नेते आहेत. एनपीपी आघाडीकडून ते राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. अलिकडील काळात JVPने आपली भारतविरोधी भूमिका बदलली आहे. मात्र, अनुरा यांनी निवडणुकीपूर्वी भारतीय कंपनी अदानींविरोधात वक्तव्य करून नवा वाद सुरू केला आहे. अदानी प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा सार्वभौमत्वाला धोका असल्याचे अनुरा यांचे म्हणणे आहे. अदानी समूहाने पवन ऊर्जा केंद्र विकसित करण्यासाठी यावर्षी श्रीलंका सरकारसोबत करार केला आहे. यासाठी कंपनी 442 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 367 कोटी) गुंतवणूक करणार आहे.

अनुरा तरुणांमध्ये लोकप्रिय  

गेल्या चार वर्षांत अनुरा दिसानायके आणि एनपीपी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. श्रीलंकेतील लोकांना आर्थिक सुधारणा आणि सामाजिक समानतेसाठी एनपीपीकडून खूप अपेक्षा आहेत, कारण ते यापूर्वी कधीही सत्तेत नव्हते त्यामुळे लोकांचा अधिक विश्वास आहे. अनुरा कुमार दिसानायके तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. एनपीपीच्या वाढत्या लोकप्रियतेचे दुसरे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आश्वासन. अनुरा प्रत्येक मोहिमेत श्रीलंकेला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन देत आहेत. देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचे मुख्य कारण भ्रष्टाचार आहे, असे तरुणांना वाटते. पक्षाने मजबूत आंतरराष्ट्रीय संबंधांवरही काम केले आहे. NPP शिष्टमंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट दिली आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
ISRO SpaDeX Docking : इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
इस्त्रोकडून अंतराळात डॉकिंग प्रणालीची मोहीम फत्ते; दोन अंतराळयान जोडले, चांद्रयान 4 मोहिमेसाठी शंभर हत्तींचे बळ
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Embed widget