एक्स्प्लोर

China Beautiful Governor Zhong Yang : स्टाफमधील 58 जणांसोबत शारीरिक संबंध अन् 71 कोटींची लाच घेतली; 'ब्यूटीफूल गव्हर्नर'ला 13 वर्षांची जेलवारी!

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, झोंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून गुईझोउचे उपसचिव आणि गर्व्हनर राहिल्या आहेत. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पक्षात प्रवेश केला.

China Beautiful Governor Zhong Yang : चीनमध्ये 'ब्यूटीफूल गव्हर्नर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुइझोउ प्रांताचे गव्हर्नर झोंग यांग यांना 13 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1 कोटी 16 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. 52 वर्षीय झोंग यांग यांच्यावर 71 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आणि सोबत काम करणाऱ्या 58 लोकांशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, झोंग चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून गुईझोउ प्रांताच्या उपसचिव आणि गर्व्हनर राहिल्या आहेत. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी पक्षात प्रवेश केला. जानेवारी 2023 मध्ये, चीनच्या गुइझोउ रेडिओने झोंगशी संबंधित वादांवर अहवाल दिला होता. 

पदाच्या नावाखाली आवडीच्या कंपन्यांना कंत्राटे 

सरकारी गुंतवणुकीच्या नावाखाली आपल्या मर्जीतील कंपन्यांना मोठे कंत्राट मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. एका प्रकरणात, झोंग यांनी एका व्यावसायिकाला 1.7 लाख चौरस मीटर जमिनीवर हायटेक औद्योगिक वसाहत बांधण्याचे कंत्राट मिळवून दिले. या व्यावसायिकाचे झोंग यांच्याशी जवळचे संबंध होते. झोंग यांनाही या कराराचा खूप फायदा झाला. कागदपत्रांनुसार, झोंग ज्या कंपन्यांशी वैयक्तिक संबंध होते त्यांना मदत करत होत्या. एप्रिल 2023 मध्ये, गुइझो प्रांताच्या पर्यवेक्षण समितीने झोंग यांच्याविरुद्ध तपासाची घोषणा केली. या काळात झोंग यांच्यावर स्टाफमधील 58 जणांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही करण्यात आला होता.

2023 मध्ये अटक, पक्षातून हकालपट्टी

यापैकी बहुतेक लोक जे होते ज्यांच्या व्यवसायातून झोंग यांना फायदा झाला होता. तसेच झोंग यांच्यासोबत काम करणाऱ्या काही लोकांचाही समावेश होता. चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार, झोंग बिझनेस ट्रिप किंवा ओव्हरटाइमच्या बहाण्याने या लोकांना भेटत असे. झोंग यांना गेल्यावर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती.

यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये चीनच्या झोंग यांची कम्युनिस्ट पार्टी आणि नॅशनल पीपल्स काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्यावर बनवलेल्या माहितीपटात झोंग यांग यांनी आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाल्याचे म्हटले आहे. माझ्या पालकांनी मला कामावर प्रामाणिक राहण्याचा सल्ला दिला, पण मी त्यांचे ऐकले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.  यापुढे सहकारी, कुटुंब आणि राजकीय नेते यांच्याशी संपर्क साधू शकत नसल्याचेही म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Gold Rate Today:एकीकडे रुपया कमजोर, शेअर बाजारात घसरण, दुसरीकडे सोने -चांदीच्या दरात तेजी, जाणून घ्या दर
रुपया कमजोर, बाजारात घसरण,गुंतवणूकदारांची सोने चांदीला पसंती, दरात तेजी, जाणून घ्या दर
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Embed widget