एक्स्प्लोर
विवाहित व्यक्ती अविवाहितांपेक्षा जास्त आनंदी : सर्वेक्षण
1991 ते 2009 या कालावधीत लग्न झालेल्या जवळपास तीस हजार व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं.
लंडन : विवाहित व्यक्ती सर्वात जास्त सुखी आणि आनंदी असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षामुळे अनेकांच्या भुवया आश्चर्यने उंचावल्या असतील, पण 'जर्नल ऑफ हॅपीनेस स्टडीजमध्ये' हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
विवाहित व्यक्ती अविवाहितांपेक्षा अधिक आनंदी असल्याचं या संशोधनातून समोर आलं आहे. युनाटेड किंग्डममध्ये हे संशोधन करण्यात आलं.
1991 ते 2009 या कालावधीत लग्न झालेल्या जवळपास तीस हजार व्यक्तींचं सर्वेक्षण करण्यात आलं. सोबतच 2011 ते 2013 दरम्यान सर्व वयोगटातील विवाहित, अविवाहित आणि कधीही लग्न न करण्यावर ठाम असलेल्या व्यक्तींचा सर्व्हे घेण्यात आला.
मध्यमवयातल्या मुलांसाठी विवाह खरोखरच आयुष्याचा आनंद वाढवू शकतो, असा निष्कर्ष यातून काढण्यात आला. सहचरासोबत सर्व खर्च वाटून घेता येतात, संकटांना एकटं सामोरं जाण्याची भीती नसते, इतर विवाहितांसोबत अनुभव शेअर करता येतात, असे अनेक फायदे असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement