(Source: Poll of Polls)
LinkedIn देणार आपल्या 15,900 कर्मचाऱ्यांना 'रिचार्ज' होण्यासाठी एक आठवड्याची पगारी रजा
कामाच्या अतिरिक्त ताणापासून मुक्त होण्यासाठी LinkedIn आपल्या जगभरातील 15,900 कर्मचाऱ्यांना एक आठवड्यासाठी पगारी रजा देणार आहे.
LinkedIn : मायक्रोसॉफ्टच्या मालकीच्या असणाऱ्या प्रोफेशनल नेटवर्क कंपनी लिंक्डइनने आपल्या जगभरातील 15,900 कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुट्टी सर्व कर्मचाऱ्यांना पुढच्या आठवड्यात मिळणार आहे. आपल्या कर्मचाऱ्यांनी या काळात सर्व ताण तणापासून मुक्त होऊन पुन्हा काम करण्यास रिचार्ज व्हावं असा उद्देश ही रजा देण्यामागे असल्याचा कंपनीने स्पष्ट केलंय.
लिंक्डइनच्या अधिकारी तेइला हॅन्सन या म्हणाल्या की, कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी मौल्यवान गोष्ट द्यायची होती आणि सध्याच्या काळात वेळ ही गोष्टच सर्वात मौल्यवान आहे असं कंपनीच्या प्रशासनाला वाटतंय. त्यामुळे येत्या काळात कंपनीची प्रगती करायची असेल तर कर्मचारी आनंदी राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Professional social network LinkedIn is giving nearly all of its 15,900 full-time workers next week off as it seeks to avoid burnout and allow its employees to recharge, the company tells @AFP pic.twitter.com/NyqPUc7yw8
— AFP News Agency (@AFP) April 3, 2021
सातत्याने केलेल्या कामामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्यापासून वाचण्यासाठी आणि काही काळ निवांत व्यतित करण्यासाठी कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना एका आठवड्याची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यामध्ये आनंद व्यक्त केला जातोय. आता कंपनीचे सर्वच कर्मचारी रजेवर असल्याने कोणालाही कामासंबधी मेल, मीटिंगचे फोन्स किंवा इतर काही गोष्टींचा या काळात काही त्रास होणार नाही.
कंपनीच्या 15,900 कर्मचाऱ्यांना रजा मिळणार आहे पण या काळात लिंक्डइनच्या कोअर टीमचे सदस्य काम करत राहणार आहेत. हे सदस्य नंतर आपल्या वेळेप्रमाणे रजा घेणार आहेत. कोरोनामुळे कंपनीचे कर्मचारी गेले वर्षभर वर्क फ्रॉम होम करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :