पेटंट उल्लंघनाच्या प्रकरणात Apple ला तब्बल 2234 कोटी रुपयांचा दंड, अमेरिकन न्यायालयाचा आदेश
आयफोन बनवणाऱ्या प्रसिध्द Apple कंपनीला अमेरिकेत पेटंट कायद्याच्या (USA Patent Act) उल्लंघन प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.
Apple : आयफोनची निर्माती करणारी दिग्गज कंपनी Apple ला अमेरिकेत पेटंट कायद्याच्या उल्लंघनाच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून तिला तब्बल 2234.84 कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. अमेरिकेतील मार्शल, टेक्सासच्या एका फेडरल ज्युरीने Apple ला पर्सनलाइज्ड मीडिया कम्युनिकेशन्स (PMC) या कंपनीला 30.85 कोटी डॉलर अर्थात 2234.84 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश डिजिटल राइट्स मॅनेजमेन्टच्या पेटंट उल्लंघन प्रकरणात दिला आहे.
पर्सनलाइज्ड मीडिया कम्युनिकेशन्सने (PMC) Apple वर असा आरोप लावला होता की त्यांनी फेअर प्ले पेटंट कायद्याचे उल्लंघन केलं आहे. याचा वापर Apple ने iTunes, App Store आणि अॅपल म्युझिक अॅप मध्ये केला होता. पाच दिवस चाललेल्या या निवाड्यानंतर Apple ला दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे न्यायालयाच्या या निर्णयावर Apple ने नाराजी व्यक्त केली असून यामध्ये त्यांच्या ग्राहकांचे नुकसान होत असल्याचं सांगितलं आहे.
टेक्सासच्या न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात Apple आता वरच्या न्यायालयात अपील करणार असल्याची बातमी आहे. Apple ने या प्रकरणावर नाराजी व्यक्त करताना सांगितलं आहे की अशा प्रकारच्या प्रकरणात काही कंपन्या अशा आहेत की ज्या काहीच उत्पादने निर्मिती करत नाहीत, त्यांची विक्रीही करत नाहीत, त्या केवळ या क्षेत्रातला इनोव्हेशन संपवतात. त्यामुळे शेवटी ग्राहकांचे नुकसान होतं.
Mark Zuckerberg | अॅपलच्या iOS 14 प्रायव्हसी बदलाचा फायदा फेसबुकलाच; मार्क झुकरबर्गचा दावा
हे प्रकरण सहा वर्षापूर्वी 2015 साली न्यायालयात नेण्यात आलं होतं. परंतु Apple ने पेटंट ट्रायल आणि अपील बोर्डमध्ये या पेटंच्या वैधतेला आव्हान दिलं. त्यवळी न्यायालयाने सांगितलं होतं की हा पेटंट दावा वैध नाही. त्यानंतर गेल्या वर्षी, 2020 साली अमेरिकन अपील न्यायालयाने आधीच्या न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार केला आणि तो निर्णय बदलला. त्यामुळे हा खटला पुन्हा सुरु झाला.
गुगलने अशा प्रकारचे पेटंट जिंकलंय
पर्सनलाइज्ड मीडिया कम्युनिकेशन्सने (PMC) अनेक पेटंट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गुगल आणि त्याच्या यूट्यूब सर्व्हिसवर याचिका दाखल केली होती. त्या व्यतिरिक्त नेटफ्लिक्सवरही दावा दाखल केला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुगल आणि त्याच्या यूट्यूब सर्व्हिसने हा पेटंट निवाडा जिंकला होता. पण नेटफ्लिक्ससोबतचा दावा अजून सुरुच आहे.
Chandro Tomar | पुरुषसत्ताक व्यवस्थेचा वेध घेणारी 89 वर्षाची 'शूटर दादी'