(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tokyo Olympics 2020 : इतिहास घडणार! न्यूझिलंडची वेटलिफ्टर लॉरेल हबार्डची पहिली ट्रान्सजेंडर ऑलंपियन म्हणून निवड
First Transgender Olympian : न्यूझिलंड ऑलिम्पिक समितीने 87 किलो वजनावरील गटात ट्रान्सजेंडर असलेल्या लॉरेल हबार्डची (Laurel Hubbard) निवड केली आहे. त्यामुळे येत्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी लॉरेल हबार्ड ही पहिलीच ट्रान्सजेंडर स्पर्धक म्हणून इतिहास घडवणार आहे.
Tokyo Olympics 2020 : टोक्यो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये इतिहास घडणार असून या स्पर्धेत पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी स्पर्धक भाग घेणार आहे. न्यूझिलंड ऑलिम्पिक समितीने (NZOC) सोमवारी त्या देशाची वेटलिफ्टर असलेल्या लॉरेल हबार्ड या ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड 87 किलो वजनावरील गटामध्ये केली आहे. 2013 सालच्या स्पर्धेत लॉरेल हबार्डने पुरुषांच्या गटातून भाग घेतला होता.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (International Olympic Committee) 2015 साली काही नियमांमध्ये बदल केला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की ट्रान्सजेंडर स्पर्धकाचे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण हे मर्यादित असून त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत नाही. त्यामुळे ट्रान्सजेंडर स्पर्धकांना महिलांच्या गटातून भाग घेण्यात काही हरकत नाही. या नियमाच्या आधारे लॉरेल हबार्डची निवड करण्यात आली आहे.
Laurel Hubbard, a weightlifter from New Zealand selected as first transgender Olympian.
— AFP News Agency (@AFP) June 22, 2021
Hubbard became eligible to lift as a woman after showing testosterone levels below the threshold required by the International Olympic Committeehttps://t.co/Kpwfh8h7e9#AFPgraphics pic.twitter.com/1kZfGX12lD
लॉरेल हबार्डने या आधी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला असून त्यामध्ये विविध पदकंही मिळवली आहेत. लॉरेल हबार्डचे आताचे वय हे 43 वर्षे इतकं असून आठ वर्षांपूर्वी तिच्या हार्मोन्समध्ये बदर झाल्याचं सांगण्यात येतंय. आपल्याला अशी ,संधी मिळाल्याने आपण सर्वांचे आभारी आहोत अशी भावना लॉरेल हबार्डने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Majha Katta : 'माझा'च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश; वर्धापन दिन विशेष माझा कट्ट्यावर मुख्य संपादक राजीव खांडेकरांची भावना
- Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात हजारो मूकबधीर मुलं-महिलांचं धर्मांतर, ATS कडून दोघांना अटक
- Corona Update India : देशात 91 दिवसांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत 1167 रुग्णांचा मृत्यू