Japan Tsunami : जुलै 2025 मध्ये जपानमध्ये त्सुनामी येणार, चार वर्षांपूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली, कोण आहेत रियो तात्सुकी?
Tsunami In Pacific Ocean : जपानला त्सुनामीचा धोका असल्याने आतापर्यंत 20 लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे.

Japan Tsunami : रशियामध्ये झालेल्या भूकंपामुळे जपानमध्ये 16 वेगवेगळ्या ठिकाणी त्सुनामीच्या लाटा येऊन एकच खळबळ उडाली. याच दिवशी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि हवाई किनारपट्टीवरही लाटांचे परिणाम जाणवले. रशियाच्या कामचाटका भागात 8.8 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्यामुळे जपानवर त्सुनामीचे संकट आले. यामुळे जपानने फुकुशिमा अणुप्रकल्प रिकामा केला. त्याचप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावरील 20 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे निर्देश जारी केले
जपानमध्ये आलेल्या या त्सुनामीमुळे एक नाव पुन्हा चर्चेत आलं, रियो तात्सुकी, एक जपानी मंगा आर्टिस्ट, ज्याने वर्षांपूर्वीच या त्सुनामीची अचूक भविष्यवाणी केली होती. जुलै 2025 मध्ये जपानमध्ये त्सुनामी येईल अशी भविष्यवाणी रियो तात्सुकी यांनी 2021 साली केलं होतं. ते आता सत्यात उतरलं आहे.
कोण आहे रियो तात्सुकी?
रियो तात्सुकी या एक प्रसिद्ध मंगा (जपानी कॉमिक्स) कलाकार आहेत. त्यांचं पहिलं चर्चित ग्राफिक नॉवेल ‘The Future I Saw’ 1999 मध्ये प्रकाशित झालं होतं. या कथेत त्यांनी 2011 मधील फुकुशिमा त्सुनामी आणि आण्विक संकटाचे अचूक वर्णन केलं होतं. ते नंतर सत्यात उतरलं.
बाबा वेंगा यांच्याशी तुलना का?
बाबा वेंगा या बल्गेरियातील प्रसिद्ध अंध भविष्यवक्ता होत्या. त्यांनी 9/11, चेर्नोबिल दुर्घटना आणि सोव्हिएत संघाच्या विघटनासारख्या ऐतिहासिक घटनांची अचूक भविष्यवाणी केली होती. त्याचप्रमाणे रियो तात्सुकी यांनी चित्र आणि कथांच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तवतात. म्हणून त्यांना 'जपानची बाबा वेंगा'अशी उपमा दिली जात आहे.
The Future I Saw मध्ये 2025 त्सुनामीचा उल्लेख
2021 मध्ये प्रकाशित झालेल्या या ग्राफिक नॉवेलच्या नवीन आवृत्तीत रियो तात्सुकी यांनी 2025 च्या जुलैमध्ये त्सुनामी येईल असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्या कथेनुसार, उन्हाळ्याच्या सुट्टीत, जेव्हा लोक विश्रांती घेत असतील, तेव्हा समुद्रातून येणाऱ्या उंच लाटा सर्व काही गिळंकृत करतील.
भविष्यवाणी ठरली खरी
जपानमध्ये 16 पेक्षा अधिक ठिकाणी समुद्री लाटा उसळताना दिसत आहेत. त्यामध्ये 20 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सरकारी सायरन, आपत्कालीन सेवांचा गोंगाट, आणि समुद्र किनाऱ्यावरून होणारी पलायन असंच चित्र सर्वत्र दिसत आहे.
रियो तात्सुकी यांची भविष्यवाणी केवळ कल्पनारंजन नव्हती, तर वास्तवात घडणाऱ्या घटनांची एक झलक होती. त्यांच्या कथांनी पुन्हा एकदा भविष्यकथनाच्या शक्यतांवर चर्चा सुरू केली आहे.
ही बातमी वाचा :
























