Israel-Palestine Conflict : इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना, युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? A to Z प्रश्नांची उत्तरे
Israel Palestine Conflict : इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना आहे, मग युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? याबाबत सविस्तर माहिती वाचा.
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. या संघर्षात आतापर्यंत 4200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांसह परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायल-हमास संघर्ष 75 वर्ष जुना आहे, मग युद्ध आताच का? पॅलेस्टाईनची भूमिका काय? याबाबत सविस्तर माहिती वाचा.
इस्रायल-हमास संघर्ष जुना
शेख हमाद यासीन यांनी 40 वर्षा पूर्वी हमासची स्थापना केली. हमास हा उर्दू शब्द असून याचा अर्थ हरकतल मुकल्वामा अल इस्लामिया असा आहे. ब्रिटीशांनी 1948 साली पॅलेस्टाईन भागाची विभागणी करून इस्रायल या देशाची निर्मिती केली. हा अनेक देशांमध्ये पसरलेल्या 'मुस्लिम ब्रदरहूड' हमासचा एक भाग आहे. गाझा स्ट्रीप म्हणतात अशा 365 किलोमीटरच्या भागांमध्ये 2.2 मिलियन पॅलेस्टेनियन लोक राहतात.
इस्रायल-हमास संघर्षाला सुरुवात कधी आणि कशी झाली?
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक ज्यू विस्थापित झाले त्यांना राहण्यासाठी जागाच नव्हती त्यामुळे ब्रिटिश अमेरिका आणि इतर जेत्या राष्ट्रांनी पण विशेषतः ब्रिटिशांनी पॅलेस्टीनमध्ये इस्रायलला म्हणजे ज्यू साठी जागा दिली. ब्रिटीशांनी 1948 साली ब्रिटीशांनी पॅलेस्टाईनपासून इस्रायल वेगळं केल्यामुळे या संघर्षाला सुरुवात झाली. इस्रायल-पॅलेस्टिनी यांच्यात 1967 साली 6 दिवसाचे युध्द झालं आणि इस्रायलने जवळपास सर्व भूभाग आपल्या ताब्यात घेतला. 2005 साली अनेक चर्चेच्या फेऱ्यानंतर इस्रायलने गाझा स्ट्रीप मधून माघार घेतली. पण, गाझा पट्टीतली पाणी, ऊर्जा आणि इंधन हे सगळे इस्रायलच्या ताब्यात होते आजही आहेत .
युद्ध आताच का?
वेस्ट बँकमध्ये पुरातन वस्ती ईस्ट जेरुसलेमस. त्याशिवाय ज्यू ख्रिश्चन आणि मुस्लिमांची या ठिकाणी पवित्र धार्मिक स्थळ आहेत. यावर्षी रमजान महिन्याच्या आधी इस्रायलींनी पवित्र मज्जिदीच्या प्रवेशापैकीच एक प्रवेशद्वार दमास्कस गेट बंद केलं, त्याला तारेचे कुंपण घातलं. या काळामध्ये तिथे येणाऱ्यांची संख्या आम्हाला नियंत्रित करायची आहे, असं इस्रायल म्हणणं होतं तर, हा आपल्या धार्मिक कृत्यामध्ये हस्तक्षेप आहे असं, पॅलेस्टीनींचे मत झालं आणि नंतर संघर्ष सुरू झाला. त्याचं रुपांतर आता युद्धात झालं आहे.
हमासच्या हल्ल्याची पार्श्वभूमी
दोन्ही समुदायांमध्ये झटापटी वाढल्या निर्वासितांच्या भागात हल्ले झाले. लोकांना आपण आपल्या रोजगाराच्या ठिकाणी म्हणजे वेस्ट बँकेकडे जाऊ की नाही याबद्दलची खात्री वाटेना. त्यातून तणाव वाढत गेला. 7 ऑक्टोबरला हमासने केलेल्या हल्ल्याची ही पार्श्वभूमी आहे.
50 वर्षानंतर पुन्हा हल्ला
या हमासच्या हल्ल्यालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पन्नास वर्ष याआधी अशाच पद्धतीचा हल्ला झाला होता. महत्वाचं म्हणजे ज्या हल्ल्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी हा हल्ला झाला. महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी हल्ला झाला, त्या दिवशी यहुदी म्हणजे ज्यू लोकांचा धार्मिक सोहळा सुरू होता.
गाझामध्ये हमास या संघटनेचा तळ कोणता आहे, याची आपल्याला कोणतीही खात्रीपूर्वक माहिती नाही. म्हणून आम्हाला संपूर्ण गाझा पट्टीतील लोकांना बाहेर काढायचे आहे, अशी इजरायलची भूमिका आहे. त्यातूनच गाझा पट्टीवरती बॉम्बवर्षाव सुरू आहे. अगदी यूएननी सुरू केलेली शाळा सुद्धा त्या बॉम्बहल्ल्यातून वाचलेली नाही. जेवढे इस्रायली नागरिक मारले गेले, त्याच्या कित्येक अधिक नागरिक गाझा पट्टीत मारले गेलेले आहेत.