Israel Hamas War: 'या' 13 मुस्लिम देशांनी घेरलेला आहे इस्रायल; चारही दिशांना शत्रूचा वावर
Hamas Israel War: इस्रायल देश स्थापन झाल्यापासूनच त्या देशावर हल्ले सुरू झाले होते, जवळपास 8 शेजारील देशांनी इस्रायलवर हल्ला केला होता. अशात इस्रायलने एकीच्या बळावर त्या सर्व देशांना हरवलं होतं.
Hamas Israel War: इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालं आहे. हमासने गुप्तपणे इस्रायलवर (Israel) प्राणघातक हल्ला चढवला, त्यानंतर इस्रायलने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हमासला (Hamas) संपवून टाकण्याचं इस्रायलने ठरवलं आहे. इस्रायलवर सातत्याने हवाई हल्ले होत आहेत आणि आकाशातून आगीच्या गोळ्यांचा वर्षाव होत आहे.
इस्रायल (Israel) हा एक छोटासा देश आहे, पण देशावरील प्रत्येक हल्ल्याला तो चांगलंच प्रत्युत्तर देतो, यावरून त्याच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. इस्रायलचं सैन्य आणि त्यांचं तंत्रज्ञान जगभर प्रसिद्ध आहे. इस्रायलला चारही बाजूंनी शत्रूंनी (Enemy) वेढलं आहे, पण आजतागायत इस्रायलला (Israel) कुणीही संपवू शकलेलं नाही. आता नेमक्या कोणत्या मुस्लिम देशांनी (Muslim Countries) इस्रायल वेढलेला आहे, हे पाहूया.
इस्रायलच्या निर्मितीपासूनच संघर्ष सुरू
इस्रायल देशाची स्थापना तर झालीच, पण यासोबतच त्याचा संघर्षही सुरू झाला. मुस्लिम देशांनी इस्रायलला काबीज करून त्याचा नाश करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांना यात यश आलं नाही. इस्रायलमध्ये जगातील सर्वाधिक ज्यू एकत्र राहतात, हा संपूर्ण देश फक्त ज्यूंचा आहे. आखाती देशातील सर्व मुस्लिम देश या छोट्याशा देशाचा प्रचंड तिरस्कार करतात.
इस्रायल अधिक शक्तिशाली
1948 मध्ये इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या जवळपास 8 शेजारी देशांनी एकत्रितपणे इस्रायलवर हल्ला केला, परंतु इस्त्रायली सैन्यासमोर ते टिकू शकले नाहीत. या काळात इस्रायलने पॅलेस्टिनींना मागे ढकलण्याचं काम केलं. आज इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद ही जगातील सर्वात शक्तिशाली एजन्सीपैकी एक आहे, जे कुठेही कोणतेही ऑपरेशन करू शकतात.
कोणत्या मुस्लिम देशांनी वेढला आहे इस्रायल?
इस्रायल हा ज्यू देश आहे आणि तोही खूप लहान आहे, त्याचे सर्व शेजारी मुस्लिम देश आहेत. त्यांपैकी बहुतेक इस्रायलचे कट्टर शत्रू आहेत, जे कधीही त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असतात. इस्रायल सुमारे 13 मुस्लिम देशांनी वेढलेला आहे.
ज्यामध्ये इजिप्त, इराक, अल्जेरिया, कुवेत, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन, लिबिया, मोरोक्को, सौदी अरेबिया, पॅलेस्टाईन, सुदान आणि ट्युनिशिया या देशांचा समावेश आहे. इस्रायलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये इजिप्त, जॉर्डन, इराक, कुवेत, सीरिया, सौदी अरेबिया, सुदान आणि अल्जेरिया या देशांचा समावेश होता.
हेही वाचा: