Israel-Palestine Conflict : युद्ध हमासने सुरु केलं, आम्ही संपवणार, इस्रायलच्या पंतप्रधानांचा हमासला कडक शब्दात इशारा
Israel-Hamas War : युद्ध आम्ही सुरू केलेलं नाही, पण हे युद्ध आम्हीच संपवणार, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.
Israel PM Benjamin Netanyahu : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel-Palestine Conflict) दहशतवादी संघटना हमास (Hamas) यांच्यी संघर्ष तीन दिवसानंतरही कायम आहे. हमासच्या हल्ल्यात (Israel-Hamas Conflict) इस्रायलच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी (Gaza Update) हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 500 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या संघर्षादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला इशारा दिला आहे. हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे.
युद्ध हमासने सुरु केलं, आम्ही संपवणार
या हल्ल्याला हमास अशाप्रकारे प्रत्युत्तर देईल की संपूर्ण वातावरण बदलून जाईल, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला. 'हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू. कुटुंबीयांची त्यांच्याच घरात हत्या करणे, संगीत महोत्सवात शेकडो तरुणांची हत्या करणे, स्त्रिया, मुले आणि वृद्धांचे अपहरण करणे, अगदी होलोकॉस्ट वाचलेल्यांचे अपहरण करणे, हे निर्दोष इस्रायली लोकांवर हमासने केलेले क्रूर हल्ले मनाला चटका लावणारे आहेत'', असं नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे.
अनेक देशांनी हमासच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, भारत, जर्मनी, इटलीसह जगातील अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. इराणकडून मात्र, इस्रायलवरील हल्ल्याचा आनंद व्यक्त केला जात आहे.
Israel is at war.
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) October 9, 2023
We didn’t want this war.
It was forced upon us in the most brutal and savage way.
But though Israel didn’t start this war, Israel will finish it.
Once, the Jewish people were stateless.
Once, the Jewish people were defenseless.
No longer.
Hamas will… pic.twitter.com/eVECGnzLu3
'आम्ही हमासचा नायनाट करू'
इस्रायली संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही हमासचा नायनाट करू. युद्धानंतर हमासकडे कोणतीही लष्करी क्षमता आणि गाझावर राज्य करण्याची क्षमता राहणार नाही, याचीही खात्री करु. इस्रायलने हमासशी लढण्यासाठी गाझामध्ये एक लाख अतिरिक्त सैनिक पाठवले आहेत. अमेरिकाही इस्रायलच्या मदतीसाठी पुढे आली असून बायडन यांनी इस्रायलला लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे.
गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हवाई हल्ला केला. हमासचे दहशतवादी सशस्त्रमध्ये घुसले, यानंतर इस्रायलमधील परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. महिला, मुले आणि वृद्ध पॅलेस्टिनी सर्वांना लक्ष्य करत आहेत. हमासने जमीन, हवाई आणि समुद्रातून 5000 रॉकेट इस्रायलवर डागले. यानंतर युद्धाला सुरुवात केली.
महत्वाच्या इतर बातम्या :