एक्स्प्लोर
Advertisement
नीरव मोदी प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची बदली, केसवर परिणाम होण्याची शक्यता
नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे,
नवी दिल्ली : नीरव मोदी प्रकरणाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी सत्यव्रत कुमार यांची बदली करण्यात आली आहे, तसेच त्यांना ईडीच्या सहसंचालक पदावरुनही हटवण्यात आले आहे. कुमार हे या प्रकरणाचा अगदी सुरुवातीपासून तपास करत होते. ते सध्या लंडनमध्येच आहेत. नीरव मोदी प्रकरणावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी आज सायंकाळी 6.30 वाजता लंडनमध्ये सुनावणी सुरु होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदी याला 19 मार्च रोजी लंडन येथे अटक करण्यात आले. अटकेनंतर त्याला इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात सादर करण्यात आले असून या कोर्टात त्याच्यावर सध्या खटला सुरु आहे.
नीरव मोदी जानेवारी 2018 पासून भारतातून फरार झाला आहे. नीरव आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआय तपास करत आहेत.
वाचा : पीएनबी घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीला अखेर बेड्या, नऊ दिवसांची कोठडी
EXCLUSIVE | कर्जबुडवा नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद | लंडन | एबीपी माझा
The hearing in the matter will now resume, after the lunch break, at 2.10 pm (London time). https://t.co/FK5FUaCoUe
— ANI (@ANI) March 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement