International Dance day 2021: आंतरराष्ट्रीय नृत्य दिन का साजरा केला जातो माहितीये का?
आज जगभर आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस (International Dance day 2021) साजरा करण्यात येतोय. आपल्या जीवनात असलेले नृत्याचे महत्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय.
International Dance day 2021: नृत्य किंवा डान्स हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या या नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातोय.
In these tough times, consider every moment as an opportunity. On this #InternationalDanceDay, let's get together for sharing positivity with all. We are looking for your short dance videos in your favourite dance styles. Share and get a chance to be featured. pic.twitter.com/naHWFyijBr
— ICCR (@ICCR_Delhi) April 27, 2021
दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. पण या वर्षी कोरोनाची प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस साजरा करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातोय.
आंतरराष्ट्रीय नाट्य संस्था अर्थात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशनने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूशन ही युनेस्कोची कला प्रदर्शनासाठी भागिदार संस्था आहे. जगभरातील अनेक प्रसिद्ध डान्सर्स आणि कोरियोग्राफर्स या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेने आधुनिक बेले डान्सचा निर्माता समजले जाणारे जॉर्जेस नोवेर यांना सन्मानित करण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा करण्याचं ठरवलं.
जगभर हा दिवस सर्व देशांच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक सीमा पार करून नृत्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. नृत्य ही एक जगाला जोडणारी भाषा आहे. त्यामुळे या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.
महत्वाच्या बातम्या :