(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Indian Railway | भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या रंजक गोष्टी तुम्हाला माहितीयेत?
आजच्या घडीला असंख्यजणांना रोजगार पुरवणारी ही रेल्वे दर वर्षी आणखी वयोवृद्ध होत नाहीये, तर ती आणखी तरुण होत चालली आहे.
Happy Birthday Indian Railway : भारतीय रेल्वेचं जाळं असं काही पसरलं आहे, ज्यामुळं जागतिक पटलावर देशाचा एक वेगळी ओळख मिळाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा तसा फार जुना. आज अशाच या रेल्वेचा वाढदिवस. जवळपास 168 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिल 1853 ला पहिली रेल्वे भारतात धावली आणि इतिहासात याची नोंद सुवर्णाक्षरात झाली. आजच्या घडीला असंख्यजणांना रोजगार पुरवणारी ही रेल्वे दर वर्षी आणखी वयोवृद्ध होत नाहीये, तर ती आणखी तरुण होत चालली आहे. दर दिवसागणिक रेल्वेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे बदल होत आहेत. ती आणखी अद्ययावत होत चालली आहे.
Ayodhya Ram Mandir | राम मंदिरासाठी देणगीत मिळालेले 22 कोटी रुपयांचे 15 हजार चेक बाऊन्स!
रेल्वेनं खऱ्या अर्थानं एक मोठा प्रवासाचा पल्ला गाठला आहे. चला तर मग, जाणून घेऊया भारतातील पहिल्या रेल्वेबद्दलच्या काही रंजक गोष्टी.
-मुंबईच्या बोरी बंदर येथून (Thane) ठाण्यापर्यंतच्या अंतरात देशातील पहिली रेल्वे धावली होती.
- पहिल्या रेल्वेमध्ये जवळपास 400 प्रवाशांनी प्रवास केला होता.
- 34 किलोमीटरचा हा पहिला प्रवास रेल्वेनं 57 मिनिटांमध्ये पूर्ण केला होता.
- वाफेच्या इंजिनाद्वारे ही रेल्वे चालवण्यात आली होती.
- ही रेल्वे पहिल्या प्रवासाला निघाली, त्यावेळी तोफांची सलामीही दिली गेली होती असं म्हटलं होतं.
- पहिला रेलरोड जगन्नाथ शंकरशेठ आणि जमशेदजी जीजीबॉय यांच्या प्रयत्नांतून साकारण्यात आला होता.
- असं म्हटलं जातं, की पहिल्या रेल्वेतील बोगींना साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावं देण्यात आली होती.
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus heritage building on the eve of Birthday of Indian Railways (16.4.1853) pic.twitter.com/UxgCv9k1km
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 15, 2021
रेल्वेमध्ये शौचालयांची सुरुवात केव्हा झाली?
1909 मध्ये रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेमध्ये शौचालयांची सुरुवात करण्यात आली. ओखिल चंद्र सेन या पश्चिम बंगालमधील एका प्रवाशानं रेल्वे स्थानकाकडे पत्र लिहित तक्रार केली होती की, लघुशंकेस गेलं असता त्यांची रेल्वे निघून गेली. या तक्रारीचीच सुनावणी करताना दिलेल्या निर्णयानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यात शौचालयांची सुरुवात करण्यात आली. याआधी रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये शौचालयं नव्हती. 1891 मध्ये फक्त प्रथम श्रेणीच्याच डब्यांमध्ये ही सुविधा देण्यात आली होती.