Indigo Flight: खराब वातावरणामुळे इंडिगोचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत; इंडिगोनं दिलं स्पष्टीकरण
Indigo Flight: इंडिगोचे अमृतसरवरुन अहमदाबादला जाणारे विमान खराब वातारणामुळे भरकटले. त्यानंतर हे विमान थेट पाकिस्तानाच्या हवाई हद्दीमध्ये शिरले.
Indigo Flight: पंजबामधील (Panjab) अमृतसरमधून गुजरातमधील अहमदाबादला (Ahemdabad) जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचे (Indigo Airlines) विमान खराब वातारणामुळे भरकटून थेट पाकिस्तानाच्या (Pakistan) हवाई हद्दीमध्ये शिरले. परंतु त्यानंतर विमान सुखरुप भारतीय हद्दीत परतले आहे. हे विमान पाकिस्तानातील लाहोरपर्यंत पोहचले होते. हे विमान शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता लाहोरच्या उत्तर भागात शिरले. परंतु त्यानंतर अर्ध्यातासात म्हणजेच, 8.01 वाजता हे विमान भारतात परतले. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे अहमदाबादमध्ये उतरवल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E-645 हे विमान अमृतसरवरुन अहमदाबादला जात होते. परंतु खराब वातावरणामुळे हे विमान अटारी सीमेवरुन पाकिस्तानात पोहचले. 'अमृतसरच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने पाकिस्तानशी समन्वय साधला. त्यानंतर हे विमान सुरक्षितपणे अहमदाबादमध्ये उतरले, असं देखील इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे.
या विमानाने अमृतसरमधून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हे विमान त्याचा रस्ता चुकले. त्यानंतर हे विमान गुजरानवालापर्यंत पोहचले आणि लाहोपर्यंत गेले. एवढे मोठा वळसा घातल्यानंतरही हे विमान वेळेपूर्वी गुजरातच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरुप उतरले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळते परवानगी
पाकिस्तानच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून दिलेल्या माहितीनुसार, 'खराब वातावरणामुळे जर विमानास काही अडचणी निर्माण झाल्या तर त्यास आंतरराष्ट्रीस स्तरावरुन परवानगी देण्यात येते.त्यामुळे ही घटना अत्यंत साधारण आहे. त्यामुळे अशावेळी आंतराराष्ट्रीय स्तरावरुन विमानाला परवानगी दिली जाते.'
मे महिन्यामध्ये पाकिस्तानचे देखील एक विमान भारताच्या हवाई हद्दीमध्ये आले होते. तेव्हा पाकिस्तानात जोरदार पाऊस सुरु होता, त्यामुळे विमानसाठी बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. त्यावेळी हे विमान दहा मिनिटांसाठी भारताच्या हवाई हद्दीमध्ये थांबले होते. पाकिस्तानचे PK248 हे विमान लाहोरमध्ये उतरणार होते. पंरतु पावसामुळे पायलटला हे विमान उतरवण्यास अडचणी निर्माण होत होती. भारतीय हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पुन्हा हे विमान पाकिस्तानातील लाहोरमध्ये सुखरुप उतरवण्यात आले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधून योग्य ते मार्गदर्शन केले जाते असं देखील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
Ahmedabad-bound IndiGo flight entered Pakistani airspace due to bad weather
— ANI Digital (@ani_digital) June 11, 2023
Read @ANI Story | https://t.co/IFWlWyKP7o#Indigo #India #Pakistan #Ahmedabad pic.twitter.com/qR5SkfJSjM