Rivers In World : जगातील या तीन नद्या गंगेसारख्या पवित्र, एक नदी जोडलेली आहे आकाशगंगेशी; वाचा सविस्तर
भारतात गंगा नदीला आईचा दर्जा दिला जातो. प्राचीन काळानुसार गंगेला हिंदू समाजात मोलाचे स्थान आहे. भारताप्रमाणेत इतर देशातही अशा काही नद्या आहेत ज्यांना त्या भागातील लोक खूप पवित्र समजतात.
Three Rivers In The World : भारतात गंगा नदीचे अनन्यसाधारण महत्व आहे. सगळे पाप गंगेत धुतले तर माणूस पवित्र होतो असे समजले जाते. प्राचीन काळापासून गंगा ही पवित्र नद्यापैकी एक मानली जाते. यामुळेच भारतात गंगा नदीला खूप पवित्र मानले जाते. हिला देशाची धमणी ही मानले जाते. आपल्या धार्मिक परंपरेनुसार या नदीला मोलाचे महत्व दिले जाते. हिंदू धर्मात कोणतीही पूजा करायची असल्यास गंगेचे पवित्र पाणी वापरले जाते. श्रद्धा असणारे लोक तर गंगेला आई म्हणून संबोधतात. आयुष्यात एकदा तरी गंगेत डुबकी मारून सगळे पाप धुवून घ्यावेत असे प्रत्येकाला वाटते. मात्र तुम्हाला माहिती आहे का, गंगेप्रमाणेच पवित्र असणाऱ्या अजून तीन नद्या इतर देशात आहेत. त्या देशातील लोकही या नद्यांना पवित्र मानतात. कोणत्या आहेत या नद्या जाणून घेऊया,
उरुबांबा नदी (Urubamba River)
उरुबांबा नदी ही दक्षिण अमेरिकेतील पेरू या ठिकाणी आहे. या नदीला उरुबांबामधील इंकास लोक खूप पवित्र मानतात. या नदीला येथील लोक आई देखील म्हणतात. उरुबांबामध्ये असणारे प्रसिद्ध स्थळ माचु पिच्चु देखील याच नदीच्या किनाऱ्याशी वसलेले आहे. येथील लोकांचे असे मानने आहे की ही अशी एकमेव नदी आहे जी थेट आकाशगंगेचे दर्शन घडवून आणते.
आशियाची जॉर्डन नदी (Jordan River)
आशियात असणाऱ्या जॉर्डन नदीला ख्रिश्चन धर्माचे लोक पवित्र मानतात. असेही मानले जाते की येशू ख्रिस्तांना याच नदीत बुडवले गेले होते. याच कारणामुळे ख्रिश्चन धर्माचे लोक या नदीला देवाप्रमाणे मानतात. इस्राईल आणि अरब लोकांमधील भांडणांमुळे ही नदी मोठ्या प्रमाणात आता दुषित झाली आहे.
नायजेरियाची ओसून नदी (Osun River)
नायजेरियाची ओसून नदी तिथल्या योरूबा जमातीसाठी अतिशय महत्त्वाची नदी आहे. योरूबा जमातीचे लोक या नदीला गंगेप्रमाणे जीवनदायी मानतात. या नदीच्या काठावर योरूबा जमातीची अनेक पवित्र ठिकाणे आहेत. यामुळेच या जमातीमध्ये या नदीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की नायजेरियातील या विशिष्ट नदीभोवती पहिली मानवी संस्कृती विकसित झाली. यामुळे या नदीवर श्रद्धा ठेवणारे लोक म्हणतात की त्यांच्या पूर्वजांच्या आत्मा या नदीत राहतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Malware removal Tools : Phone किंवा Computer मधून व्हायरस काढण्यासाठी वापरा 'हे' टूल्स
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI