एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानी हॅकर्सकडून मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची वेबसाईट हॅक
मुंबई : मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजची वेबसाईट सोमवारी पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केली. या हॅकर्सकडून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची खिल्ली उडवणारा मजकूरही टाकण्यात आला.
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हॅकर्सकडून भारतीय वेबसाइट हॅक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. मुंबईतील गर्व्हन्मेट लॉ कॉलेजची वेबसाइट सोमवारी हॅक करण्यात आली. ‘पाक सायबर पायरेटस’ याने ही वेबसाइट हॅक केली असून यात सर्जिकल हल्ल्यांची खिल्ली उडविली आहे, तसेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझटरी लिमिटेडला लक्ष्य करण्यात आलं आहे.
वेबसाईट हॅक झाल्याचं कळताच लॉ कॉलेज प्रशासनाकडून वेबसाईट पूर्ववत करण्याचे काम सुरु करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत वेबसाईट सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. साईट हॅक झाल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे कॉलेज प्रशासनाकडून योग्य त्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement