Pfizer Vaccine : युरोपियन युनियनकडून कोविड -19 लशीच्या वितरणास हिरवा कंदिल, वितरण निष्पक्षपणे करण्याचे डब्लूएचओचे आवाहन
युरोपियन युनियनने कोविड -19 लशीच्या 30 कोटी डोस पुरवठा करण्यासाठी Pfizer बायोटेकशी डील करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
Coronavirus : कोरोना व्हायरसच्या लसीचं वाट निष्पक्षपणे झालं पाहिजे, जागतिक आरोग्य संघटनचे (WHO) अध्यक्ष अध्यक्ष टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांनी म्हटलं आहे. टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं ज्यावेळी, युरोपियन युनियनने कोविड -19 लशीच्या 30 कोटी डोस पुरवठा करण्यासाठी Pfizer बायोटेकशी डील करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
#WHO Director-General @DrTedros has called for "fair allocation" of a #COVID19 vaccine after drugmakers #Pfizer and #BioNTech this week said that their vaccine candidate was found to be more than 90% effective in preventing the disease in interim analysis of data.#Pfizervaccine pic.twitter.com/6NObWrw3tl
— IANS Tweets (@ians_india) November 11, 2020
दोन दिवसांपूर्वी Pfizer या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोविड 19 लस 90 टक्के प्रभावी आहे. एक स्वतंत्र डेटा देखरेख समितीने केलेल्या विश्लेषणानुसार, Pfizer आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी होती. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. Pfizer कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आमच्या लसीची कोविड -19 रोखण्याची क्षमता दिसली आहे.
कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा
या लसीच्या अभ्यासात अमेरिका आणि अन्य पाच देशांमधील सुमारे 44,000 लोकांचा समावेश केला आहे. Pfizer चे क्लिनिकल डेव्हलपमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बिल ग्रूबेर यांनी सांगितलं की, आम्ही निकालामुळे खुप उत्साही आहोत. Pfizer आणि त्यांची जर्मन सहाय्यक BioTech कंपनी कोविड 19 ची लस तयार करण्याच्या शर्यतीत आहे.
संबंधित बातम्या