एक्स्प्लोर

Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत भारतीय अभिनेत्याचा डंका; बॉलीवूडमधील अभिनेत्यांनाही देतोय टक्कर

Indian Actor in China: चीनच्या सिनेसृष्टीत सध्या एका भारतीय अभिनेत्याचीच चर्चा आहे, आज तो चीनमधील सुपरस्टार आहे. पण हा अभिनेता आमीर खान, शाहरुख खान, प्रभास किंवा रजनीकांत नाही.

Dev Raturi : चीनच्या सिनेसृष्टीत भारतीयाने आपला दबदबा निर्माण केलाय. भारताच्या देव रतुरी याने चीनमध्ये जाऊन आपलं वर्चस्व स्थापन केलेय. चीनमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये देव रतुरी याचे नाव घेतले जाते. 2015 पासून देव चीनमध्ये अभिनयात आपला ठसा उमटवत आहे.

उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील अभिनेता देव रतुरी (Dev Raturi) आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीन (China) या देशात सुपरस्टार बनला आहे. देव रातुरी याने 2015 पासून 20 चिनी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम केलं आहे. लिऊ ताओ, वू गँग, झांग जिन, ली झाइटिंग आणि किआओ झेन्यू यांसारख्या लोकप्रिय चिनी स्टार्ससोबत त्याने काम केलं आहे.

चीनमधील शाळांत सातवीच्या पाठ्यपुस्तकांत देवची कहाणी 

असं म्हणतात की जर तुमच्यात टॅलेंट असेल तर तुम्हाला आज नाही तर उद्या नक्कीच यश मिळतं. अर्थात यासाठी थोडा अधिक संघर्ष करावा लागतो पण यश नक्की मिळतं. उत्तराखंडमधील टिहरी येथे राहणाऱ्या देव रतुरी याने हे वाक्य खरं ठरवलं आहे. देव भारतात फारसा लोकप्रिय नसला तरी त्याने चिनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे, आपल्या कौशल्यांचा डंका देवने चीनमध्ये गाजवला आहे. वेटर म्हणून काम करणारा ते सध्या अभिनेता असलेला हा भारतीय तिथे इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या संघर्षाची कथा चीनमधील शाळांच्या सातवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये शिकवली जाते. त्याच्या संघर्षातून आज चिनी मुलं प्रेरणा घेत आहेत.

अभिनयासाठी घरातून पळून गेला

भारतात एकेकाळी वेटर म्हणून काम करणारा भारतीय तरुण आज चीनमधील घराघरातील ओळखीचा चेहरा झाला आहे. देव रतुरी असं या व्यक्तीचं नाव असून अभिनयात करिअर करण्यासाठी 1998 साली देवनं उत्तरखंडवरून मुंबई गाठलं आणि तिथूनच त्याचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला. देव त्याची स्वप्नं साकार करण्यासाठी नवी दिल्लीतील त्याच्या मामाच्या घरातून पळून गेला आणि मुंबई गाठली. पण मुंबईत आल्यावर त्याला समजलं की, अभिनेता बनणं आणि बॉलिवूडमध्ये नाव कमावणं सोपं नाही. मुंबईत तो फक्त गर्दीच्या मागे बसून दुसऱ्या कलाकारांसाठी टाळ्या वाजवायचा, देवला मुंबईत कधीही कॅमेऱ्यासमोर जाण्याची संधी मिळाली नव्हती.

सुरुवातीला करायचा वेटर म्हणून काम

आज देव हा चीनमधील चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरी त्याचा संपूर्ण प्रवास प्रवास फारच कठीण आणि खडतर होता. सहा महिने मुंबईत राहून देव रातुरी दिल्लीला परतला आणि मार्शल आर्ट शिकू लागला. ब्रुस ली यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं देव सांगतो. देवने भारतात असताना वेटर म्हणून काम केलं. यानंतर 2005 मध्ये देवच्या एका मित्राने त्याला चीनमध्ये येण्यासाठी विमान तिकीट बुक करुन दिलं आणि तिथे जाऊनही तो वेटर म्हणून काम करत होता. त्या काळात त्याच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसेही नव्हते.

देव रतुरी चीनमधील 8 रेस्टॉरंटचा मालक

जीवनाची 8 वर्ष वेटर म्हणून काम केल्यानंतर देवने 2013 साली चीनमध्ये पहिलं भारतीय रेस्टॉरंट सुरू केलं. सध्या त्याच्या नावावर 8 रेस्टॉरंट आहेत. देवच्या मालकीच्या या 8 हॉटेल्समधील 50 हून अधिक कर्मचारी हे उत्तराखंडमधील आहेत. 8 रेस्टॉरंट्सचा मालक असलेला देव चीनमधील नावाजलेला उद्योगपती देखील आहे. आपल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये अगदी उत्साहाने भारतीय सण साजरे केले जातात, असं देव सांगतो. देवच्या रेस्टॉरंटमधील वेटर्सचे कपडेही भारतीय संस्कृतीप्रमाणेच आहेत.

अन् अशी झाली अभिनय क्षेत्रात सुरुवात

देव आपला व्यवसाय चालवण्यात इतका व्यस्त झाला होता की, अभिनेता बनण्याची त्याची इच्छा कमी होऊ लागली होती. पण नंतर नशिबाने त्याला अभिनयाच्या जगात आणलं. एका चिनी चित्रपट निर्मात्याने देवच्या रेस्टॉरंटला भेट दिली. तो शूटिंगसाठी ठिकाण आणि कमी बजेटच्या ऑनलाईन चित्रपटांसाठी अभिनेता शोधत होता. त्याने निर्मात्याला सहज अभिनय करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आणि तिथूनच त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली.

आगामी चित्रपटांत दिसणार या भूमिकेत

देव रतुरी याने 2015 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि आतापर्यंत त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटांत मी नेहमीच विलनच्या भूमिकेत असतो, हे खरं नसल्याचं देव म्हणाला.तर आगामी चित्रपटांमध्ये देव अंतराळवीर, मास्टर शेफ आणि चित्रपट निर्मात्याची भूमिका साकारणार असल्याची माहिती देखील त्याने दिली. आतापर्यंत देवने 35 चिनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मागील 18 वर्षांपासून देव पत्नी अंजली आणि 2 मुलांसह चीनमध्ये वास्तव्यास आहे.

हेही वाचा:

East India Company: ज्या ब्रिटीश कंपनीने भारतावर 250 वर्षे राज्य केलं, आज तीच कंपनी भारतीयाने घेतली विकत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget