एक्स्प्लोर
एक डॉलर वेतन, सुट्टी नाही, ट्रम्प यांचं मोदींच्या पावलावर पाऊल
न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. वर्षाला केवळ एक डॉलर (अंदाजे 65 ते 67 रुपये) पगार घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करणार असल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. सीबीएस या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं.
अमेरिकेच्या अध्यक्षाला वर्षाला 4 लाख डॉलर्स (अंदाजे 2 कोटी 70 लाख रुपये) इतका घसघशीत पगार मिळतो. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी तो नाकारला आहे. मला राष्ट्राध्यक्षाचा पगार किती असतो, हे माहित नाही, पण नियमानुसार मला एक डॉलर इतकी रक्कम घ्यावीच लागेल, असं ते म्हणाले. सप्टेंबर महिन्यात त्यांनी केलेल्या जाहीरनाम्यात पगार घेणार नसल्याचं सांगितलं होतं.
अध्यक्षपदाच्या काळात आपण कोणत्याही सुट्टीवर जाणार नसल्याचंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. 'खूप काम करणं बाकी आहे आणि मला नागरिकांसाठी काम करुन घ्यायचं आहे. करकपात, आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा अशा अनेक गोष्टी आहेत' असं ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेत अवैधरित्या स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असून त्यांना अमेरिकेबाहेर काढण्याचा किंवा तुरुंगात धाडण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. अमेरिकेत अशाप्रकारे राहणाऱ्यांची संख्या 20 ते 30 लाखांच्या घरात असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेत स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी सीमा बंदिस्त करणार असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अगदी अटीतटीची लढाई झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना 276 तर हिलरी क्लिंटन 218 इलेक्ट्रोलर वोट्स मिळाले. 270 ही मॅजिक फिगर होती.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सिक्सर लगावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचं सांगत निवडून आल्यास मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करु, अशी घोषणा केली होती.
संबंधित बातम्या
तुरुंग किंवा तडीपारी, डोनाल्ड ट्रम्प यांचा 'त्या' 30 लाखांना इशारा
जेव्हा ओबामा – ट्रम्प यांची भेट झाली…
डोनाल्ड ट्रम्प यांना पंतप्रधान मोदींकडून विजयाच्या शुभेच्छा
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष !
डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द
हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द
स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ
आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी
निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement