त्या दिवशी लोकांना अर्धवट माहिती दिली.. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती गंभीर होती : व्हाइट हाउस
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर अमेरिकन जनतेला जी माहिती दिली त्यापेक्षा ट्रम्प यांची प्रकृती गंभीर असल्याचा खुलासा व्हाइट हाउसने केला आहे.
वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती शुक्रवारी खूपचं गंभीर होती, अशी धक्कादायक माहिती व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दिली. कोरोनाचे निदान झाल्यानंतर ट्रम्प यांच्या प्रकृती विषयी जनतेला अर्धवटचं माहिती देण्यात आली होती. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना शुक्रवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
शनिवारी रात्री प्रसारित झालेल्या फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मीडोजने खुलासा केला. ज्यात 74 वर्षीय राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीविषयी जी माहिती लोकांसमोर आली त्यात विरोधाभास असल्याचे समोर आले आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मीडोज म्हणाले, "ट्रम्प यांना सध्या ताप नाही आणि त्यांची ऑक्सिजन लेवलही चांगली आहे. मात्र, काल आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता लागली होती. त्यांना ताप आला होता आणि त्याच्या ऑक्सिजनची पातळी वेगाने खाली येत होती, परंतु असे असूनही राष्ट्रपती उभे राहून चालू लागले."
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प हॉस्पिटलमध्ये, ट्रम्प पती-पत्नी कोरोनाबाधित
मीडोजासह व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले, की ट्रम्प यांना सौम्य लक्षणं आहेत. मात्र, ते सतत काम करत आहेत. त्यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की वॉल्टर रीड आणि जॉन्स हॉपकिन्सच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांना रुग्णालयात भरती होण्याची शिफारस केली होती. मीडोज म्हणाले, "काल सकाळपासून (जेव्हा आम्ही सर्वजण त्याच्या आरोग्याबद्दल काळजी घेत होतो) तेव्हापासून त्याच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होत आहे."
अमेरिकेला अजून महान बनवायचंय.. डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत चांगली असल्याची माहिती आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, परत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचं आहे. आम्हाला यूएसएला महान बनवायचं आहे त्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा, असं ट्वीट ट्रम्प यांनी केलं आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये ते दाखल असलेल्या ग्रेट वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमधील डॉक्टर, परिचारिका व इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं आहे.