एक्स्प्लोर

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प हॉस्पिटलमध्ये, ट्रम्प पती-पत्नी कोरोनाबाधित

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. माहितीनुसार त्यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे, तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केलं आहे. माहितीनुसार त्यांना वॉल्टर रीड हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे, तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉनली यांनी सांगितलं की गुरुवारी सायंकाळी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. काल त्यांनी कोरोना झाल्याचं सांगत क्वारंटाईन होत असल्याचं म्हटलं होतं.

एक व्हिडीओ ट्वीट करत ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, 'मी सर्वांचे आभार मानतो, मी वॉटर रीड हॉस्पिटलला चाललो आहे. मला वाटतं मी ठीक आहे मात्र सर्व गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्यात म्हणून मी दवाखान्यात दाखल होतोय.  फर्स्ट लेडी देखील ठीक आहेत. मी सर्वांचे पुन्हा आभार मानतो, हे प्रेम कधीही विसरणार नाही.'

कोरोनाची बाधा झाल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: यासंदर्भात ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, मी आणि माझी पत्नी मेलेनियाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आम्ही तात्काळ क्वारंटाईन झालो आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्विट करत आपल्या सल्लागार होप हिक्सला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं होतं. तसंच आपण क्वारंटाईन होत असल्याची माहिती दिली होती. 'अजिबात विश्रांती न घेता सतत काम करणाऱ्या होप हिक्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. फर्स्ट लेडी आणि मी आमच्या रिपोर्टची वाट पाहत आहोत. आम्ही क्वारंटाइनची प्रक्रिया सुरु केली आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.

मास्क घालायचं टाळायचे ट्रम्प कोरोनाचा फैलाव ज्यावेळी सुरु झाला होता त्यावेळी ट्रम्प अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालत नव्हते. त्यांनी म्हटलं होतं की मास्कची मला गरज वाटत नाही. मात्र नंतर त्यांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली होती.

अमेरिकेत स्थिती गंभीर  चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला. जगात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही आजघडीला अमेरिकेत आहे. तसेच कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू देखील अमेरिकेत झाले आहेत. आजघडीला अमेरिकेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7,494,671 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत  212,660 जणांना जीव गमावावा लागला आहे. तर 4,736,621 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 2,545,390 इतके आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget