एक्स्प्लोर
Advertisement
निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं
न्यूजर्सी : अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी सिक्सर लगावला आहे. न्यूजर्सीतील कार्यक्रमात ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमनं उधळली.
न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने एका चॅरिटी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. यावेळी अमेरिकेतील भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प यांनी हे कौतुकोद्गार काढले.
फोटो : एपी
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचं सांगितलं. जर आपण निवडून आलो तर नरेंद्र मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करु, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
रिपब्लिकन हिंदू कोलिशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बॉलिवूड, टॉलिवूड आणि पंजाबी संगीत कार्यक्रमांची रंगारंग होती. यातून जमा होणारा 50 टक्के निधी काश्मिरी पंडितांसाठी आणि दहशतवादाने पीडित असणाऱ्या इतर देशातील नागरिकांना दिला जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement