एक्स्प्लोर

Death Prediction : तुमचा मृत्यू कधी होणार हे आता कळणार; 'ही' टेस्ट करणार तुमच्या मृत्यूची भविष्यवाणी

Death Prediction Research : ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठाने 40 ते 69 वयोगटातील सुमारे 1000 लोकांवर मृत्यूच्या अंदाजाबाबत संशोधन केलं आहे.

Death Prediction Test : भविष्य (Future) जाणून घेण्यासाठी अनेक जण आतूर असतात. आपल्याला भविष्यात काय घडणार आहे, याची माहिती मिळाली तर, असा विचार तुम्हीही बालपणात नक्कीच केला असेल. आता तुमची ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. इंग्लंडमधील (England) विद्यापीठाने भविष्यासंदर्भात संशोधन केलं आहे. यामध्ये तुमचा मृत्यू कधी होणार (Death Prediction) आहे हे समजण्यासाठी संशोधन केलं आहे. या विद्यापीठाने दावा केला आहे की, याद्वारे तुम्हाला कळेल की तुमचा मृत्यू कधी होणार आहे. ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठाने (University of Nottingham) 40 ते 69 वयोगटातील सुमारे 1000 लोकांवर मृत्यूच्या अंदाजाबाबत संशोधन केलं आहे.

इंग्लंडमधील (England) नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने मृत्यूच्या अंदाजावर संशोधन करत मोठं यश मिळवलं आहे. नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने नुकतेच डेथ प्रेडिक्शनवरील संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कधी होणार आहे, हे आता कळू शकते. अहवालानुसार, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे कळू शकेल की कोणाचा मृत्यू कधी होणार आहे?

नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीने ब्रिटनमधील 40 ते 69 वयोगटातील सुमारे एक हजार लोकांवर मृत्यूच्या अंदाजाबाबत संशोधन केलं आहे. हे लोक मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या समस्यांनी त्रस्त होते. संशोधनात या लोकांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलं. AI (Artificial Intelligence) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने या लोकांची प्रकृती कधी बिघडते किंवा त्यांचा मृत्यू कधी होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

What is AI-Artificial Intelligence : AI म्हणजे काय?  

AI म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजेंस (AI - Artificial Intelligence) होय. आर्टिफिशल इंटेलिजेंस हे मशीनला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरवणारं तंत्रज्ञान आहे. आर्टिफिशल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाद्वारे मशीनला माहिती समजणे, त्याचं विश्लेषण करणे आणि अनुमान काढणे यासाठी मदत करते.

या टेस्टद्वारे अकाली मृत्यूची माहिती मिळेल

या संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने मानवाचा मृत्यू कधी होईल याची माहिती मिळवता येऊ शकते. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, विशिष्ट परिस्थितीत मानवाच्या मृत्यूचा अंदाज समजू शकला, तर ज्या रुग्णांचा मृत्यूजवळ आला आहे, हे समजेल. आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून केवळ अकाली मृत्यूबद्दल माहिती मिळवता येऊ शकते, पण नैसर्गिक मृत्यूबद्दल काहीही सांगता येणार नाही.

'ही' चाचणीत कशी असेल?

शास्त्रज्ञांच्या मते, मृत्यूची भविष्यवाणी करण्याची चाचणी ही रक्त तपासणीसारखीच (Blood Test) असेल. या चाचणीद्वारे काही निष्कर्ष पाहून पुढील दोन ते पाच वर्षांत रुग्णाचा मृत्यू होईल की नाही हे तज्ज्ञ सांगू शकतील. मात्र, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले की, या संशोधनातील दावे किती खरे ठरतात आहेत, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगता येणार नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Loksabha: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Shivtare : व्यापक हितासाठी पण मनाविरोधात माघार घेतली : विजय शिवतारेSridevi John Fulare: सोलापूरच्या विकासाची अवस्था फाटकी झाल्याने फाटकी साडी नेसली- फुलारेJob Majha : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत कनिष्ठ सहाय्यक पदाची भरती ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Loksabha: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : भाजपला या दोन राज्यात मोठा धक्का, एकही जागा जिंकणं कठीण
ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव? वाचा ओपीनियन पोलचा अंदाज!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
मोठी बातमी : बारामतीत अजित पवारांची धाकधूक वाढणार, 'माझा'च्या ओपनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर!
ABP C-Voter Survey : महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळण्याची चिन्हं; महत्त्वाच्या मतदारसंघात धक्कादायक कौल!
ABP C-Voter Survey : महाविकास आघाडीला 18 जागांवर यश मिळण्याची चिन्हं; महत्त्वाच्या मतदारसंघात धक्कादायक कौल!
मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!
मोठी बातमी : अजित पवारांची धाकधूक वाढली, एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये एकही जागा नाही!
ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!
ABP C-Voter Survey : महाराष्ट्रात महायुतीला 'दे धक्का', दिग्गज अडचणीत; राज्यातील या 30 जागांवर उमेदवार आघाडीवर!
ABP C Voter Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, 'माझा'च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!
Embed widget