एक्स्प्लोर
इजिप्तमध्ये आयसिसकडून बॉम्बस्फोट, मृतांचा आकडा 45 वर
कैरो (इजिप्त) : इजिप्तमध्ये आयसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा 45 वर पोहचला आहे. या हल्ल्यांमध्ये 119 जण जखमी झाले आहे. रविवारी तांता आणि अलेक्झँड्रिया या दोन शहरातील दोन चर्चमध्ये आयसिससच्या दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले.
कैरोपासून 120 किलोमीटर दूर तांता शहरातील स्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला, तर अलेक्झँड्रियामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 18 जणांना प्राण गमवावे लागले. तांतामधील चर्चमध्ये स्फोटक वस्तू ठेवून स्फोट घडवण्यात आला. मृतांमध्ये तांता कोर्टाचे प्रमुख सॅम्युअल जॉर्ज यांचाही समावेश आहे.
तांतामधील हल्ल्यानंतर अॅलेक्झँड्रियातल्या मनशिया जिल्ह्यातल्या सेंट मार्क्स कॅथेड्रलमध्ये आत्मघाती हल्ला घडवला. चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमलेल्या भाविकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक ख्रिस्ती नागरिकांवर झालेला इजिप्तमधला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement