एक्स्प्लोर

दाऊदला दगा, विश्वासू सहकाऱ्याकडून 40 कोटींचा चुना

मुंबई : 1993 च्या मुंबई साखळी स्फोटांचा मास्टरमाईंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. खरंतर यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण दाऊदचा एक विश्वासू हस्तक त्याला तब्बल 40 कोटींचा चुना लावून पसार झाला आहे. आता दाऊद त्याच्या शोधात आहे. खलीक अहमद असं या हस्तकाचं नाव आहे. खलीकने दाऊदची थोडीथोडकी नाही तर तब्बल 40 कोटींची फसवणूक केली आहे. भारतात पसरलेले दाऊदचे काळे धंदे खलीक सांभाळायचा. खलीक अहमद दाऊदच्या विश्वासातील माणूस होता. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, खलीक अहमदने मागील वर्षी दिल्लीच्या एका व्यापाऱ्याकडून 45 कोटींची वसुली केली होती. वसुलीचे पैसे दाऊदला पाठवायचे होते. यानंतर खलीकने 40 कोटी रुपये हवालामार्फत दाऊदला पाठवण्याचं नाटक केलं. त्याचसोबत 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून स्वत:कडे ठेवले. खलीक-जबीरच्या संभाषणातून फसवणुकीचा खुलासा मात्र त्यानंतर 40 कोटी आणि खलीक दोघेही बेपत्ता झाले. दाऊदचा आणखी एक हस्तक जबीर मोटी आणि खलीकचा फोन टॅप केला होता. त्यानंतर गुप्तचर यंत्रणांना ही बाब समजली. हे दोघे नेहमची भारत आणि शारजाहमध्ये ये-जा करत असतात. जबीर मोटी पाकिस्तानमधील दाऊदचा खास माणूस आहे. तोही दाऊदसाठी अवैध वसुलीचं काम करतो. दाऊदचं नाव खराब मोटीने फोनवर खलीक अहमदला पैशांच्या अफरातफरीबाबत विचारलं.  दाऊदचा विश्वासू रज्जाकनेच दाऊदला या फसवणुकीबाबत सांगितलं. रज्जाकनुसार, "खलीकने बडे हजरतच्या (दाऊद) नावाने पैसे घेतले. खलीकच्या या कृत्यामुळे अंडरवर्ल्ड जगतात दाऊदचं नाव खराब झालं आहे." खलीक आणि पैसे गायब मात्र खलीकने फसवणुकीचा इन्कार केला आहे. चुकीच्या ट्रॅन्झॅक्शनमुळे दाऊदकडे पैसे पोहोचले नसावेत. लवकरच 40 कोटी डॉनकडे पोहोचतील, असा विश्वास त्याने जबीरला दिला. मात्र त्यानंतर खलीक आणि पैसे दोन्ही गायब आहेत. खलीक अहमद सध्या मणिपूरजवळ असल्याचं कळतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget