एक्स्प्लोर

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. त्यासाठी अमेरिकेने भारताकडे या औषधाची मागणी केली आहे. जर भारताने हे औषध दिलं नाही तर प्रत्युत्तर दिलं जाईल, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली आहे.

व्‍हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता ट्रम्प म्हणाले की, "भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवणार नाही, यासाठी असं होणार नाही. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला. भारताचे अमेरिकेसोबत संबंध कायमच चांगले राहिले आहेत."

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरुन बातचीत झाली. हे औषध अमेरिकेला देण्यासंदर्भात विचार करु, असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. त्याबाबत ट्रम्प म्हणाले की, "रविवारी सकाळी आमच्यात बातचीत झाली होती. तुम्ही आम्हाला औषध दिलं तर निश्चितच या निर्णयाचं कौतुक करु. मात्र हे औषध अमेरिकेला देण्यासाठी परवानगी दिली नाही तर ठीक आहे, परंतु निश्चितच याला प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं आणि असं का होऊ नये?"

आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो : ट्रम्प ट्रम्प म्हणाले की, भारत आणि अमेरिकेच चांगले व्यापारी संबंध आहे. जर भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करुन कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं औषध आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही हे औषध फायदेशीर ठरत आहे.

कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. इटली, स्पेनसारख्या विकसित देशांनीही या व्हायरसमोर गुडघे टेकले आहेत. आता महासत्ता असलेल्या अमेरिकेची नजरही आता भारताकडे आहे. भारताकडून मदत मिळण्याची आस अमेरिकेला आहे. ट्रम्प यांच्यामते कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे औषध परिणामकारक ठरत आहे.

भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मलेरियामुळे मृत्यू होता. त्यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. परंतु कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे या औषधाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जागतिक लॉकडाऊनमुळे भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी यासाठी आवश्यक कच्चा माल एअरलिफ्ट करुन मागवण्याची विनंती सरकारकडे केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 05 November 2024भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
'काँग्रेसने कोल्हापूर उत्तरची जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव'; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Embed widget