एक्स्प्लोर

'कोणतीही चूक करू नका, कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार'; कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर WHOचा इशारा

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस म्हणाले की, 'अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या महामारीची आताच सुरुवात झाली आहे. ज्या चीनमध्ये या व्हायरसने जन्म घेतला तिथे पुन्हा या व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.'

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात हैदोस घातला आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) संपूर्ण जगाला कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावावर एक इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने सांगितलं आहे की, कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे. यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस म्हणाले की, 'अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या महामारीची आताच सुरुवात झाली आहे. ज्या चीनमध्ये या व्हायरसने जन्म घेतला तिथे पुन्हा या व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका, हा व्हायरस आपल्यासोबत बराच काळ राहणार आहे.'

डब्ल्यूएचओचे टॉप इमरजन्सी एक्सपर्ट डॉ माइक रयान यांनी आंतराष्ट्रीय वाहतूक लगचे सुरू करण्याबाबत इशारा दिला आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, 'असं करणं धोकादायक टरू शकतं.' तसेच डब्ल्यूएचओने जगभरातील लॉकडाऊन हटवण्याचा विचार करतानाही सावध राहून विचार करण्यास सांगितलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगभरातील अनेक देश लॉकडाऊनमध्ये सूट देत आहेत. काही देशांनी तर लॉकडाऊन हटवला आहे. डब्ल्यूएचओने या देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

याआधीही WHO ने दिला होता इशारा

दोन दिवसांआधी WHO ने इशारा देताना सांगितलं होतं की, 'यापेक्षाही वाईट काळ आता येणार आहे.' परंतु डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी त्यांना असं का वाटतं, यासंदर्भात कोणतंही भाष्य केलं नव्हतं. ते असंही म्हणाले होते की, WHO आधीपासूनचं कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावाबाबत जागरूक करत आहे.

दरम्यान, कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 1.84 लाखांपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. 26 लाखांहून अधिक लोक या आजाराने ग्रस्त आहेत. अमेरिकेमध्ये या आजाराने सर्वाधिक बळी घेतले आहेत. अमेरिकेत 8.5 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 47000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!

आशा आहे की, अमेरिका पुन्हा WHO ची निधी रोखणार नाही : डब्ल्यूएचओ प्रमुख

जागतिक आरोग्य संघटना, डब्ल्यूएचओचे प्रमुख म्हणाले की, 'World Health Organization चा निधी रोखणाचा जो निर्णय अमेरिकेने घेतला आहे. त्यावर ते पुन्हा विचार करतील. ते पुढे बोलताना म्हणाले की, 'अमेरिकेकडून राजीनामा मागितल्यानंतरही आम्ही जग वाचवण्यासाठी काम करत राहू.' दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात डब्ल्यूएचओचा निधी रोखणार असल्याची घोषणा केली होती.

का रोखला ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी?

अमेरिकेते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेविरोधात कठोर भूमिका घेती आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मिळणारा निधी रोखण्याचा आदेश दिल्याचं ट्रम्प यांनी 14 एप्रिलला मीडिया ब्रीफिंमध्ये सांगितलं. कोरोना व्हायरसच्या सुरुवातीपासूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO बाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे. जागतिक आरोग्य संघटाना चीन केंद्रित काम करत आहे. असं ट्रम्प म्हणाले होते. यानंतर त्यांनी WHO चा निधी रोखण्याचा इशाराही दिला होता. अमेरिकेकडून WHO ला दरवर्षी 400 ते 500 मिलियन डॉलरची मदत केली जाते. हीच मदत रोखण्यात येत आहे, असं ट्रम्प म्हणाले होते.

अमेरिकेचा WHO ला किती निधी?

जागतिक आरोग्य संघटना ही जगभरात आरोग्य क्षेत्राबाबत काम करते. यादरम्यान वर्षभर काही ना काही उपक्रम सुरुच असतात. यासाठी प्रत्येक देश जागतिक आरोग्य संघटनेत गुंतवणूक करतो. ज्यात अमेरिका हा अनेक वर्षांपासून सर्वाधित निधी देणार देश आहे. अमेरिकेने मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेला 400 मिलियन डॉलर निधी दिला होता, जो WHO च्या एकूण बजेटच्या 15 टक्के आहे. या तुलनेत चीनबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा निधी अमेरिकेच्या निधीसमोर तूटपुंजा आहे. चीनने 76 मिलियन डॉलर एवढा निधी दिला होता. याशिवाय 10 मिलियन डॉलरची अतिरिक्त मदत केली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

बिल गेट्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक! कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा

Coronavirus World Update | जगभरात कोरोनाचे सव्वासात लाख रुग्ण बरे झाले तर 56 हजार गंभीर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे
Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालयातच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
Embed widget