दिलासादायक... कोरोनावर लस तयार करणारा रशिया पहिला देश! 12 ऑगस्टला सरकार देणार मंजुरी
रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे.
मॉस्को : सध्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. अशातच जगभरातील अनेक वैज्ञानिक कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच एक आनंदाची बातमी आहे. जगाला कोरोनाची पहिली लस मिळण्याची शक्यता आहे. रशियाचे रशियाचे उप आरोग्यमंत्री ओलेग ग्रिडनेव यांनी सांगितले की, रशिया 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसवर तयार करण्यात आलेलं पहिलं वॅक्सिन रजिस्टर करणार आहे. हे वॅक्सिन मॉस्को येथील गमलेया इंस्टीट्यूट आणि रशियातील संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन तयार केलं आहे. खास गोष्ट म्हणजे, वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्याील क्लिनिकल ट्रायल अद्याप सुरु आहे.
रशिया सरकारच्या वतीने दावा करण्यात आला आहे की, Gam-Covid-Vac Lyo नावाचं हे वॅक्सिन 12 ऑगस्ट रोजी रजिस्टर करण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये याचं मास-प्रोडक्शन सुरु करण्यात येणार आहे. तसेच ऑक्टोबर पासून देशभरात लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.
सर्वात आधी वॅक्सिन रजिस्टर करण्यासाठी रशियाची धडपड
जगभरातील वैज्ञानिकांना चिंता आहे की, वॅक्सिन तयार करण्याच्या घाी गडबडीत आपल्याकडून कोणतीही चूक होता कामा नये. तसेच घाईघाईत या वॅक्सिनच्या उलट्या परिणामांचा सामना करावा लागू नये. परंतु, रशिया सर्वांच्या आधी वॅक्सिन लॉन्च करण्यासाठी धडपड करत आहे. तसेच रशियाकडून वॅक्सिन कोरोनावर प्रभावी असल्याचे दावे वारंवार करण्यात येत आहेत. परंतु, यांच्या दाव्याला दुजोरा देणारं कोणत्याही वैज्ञानिकाची साक्ष प्रकाशित करण्यात आलेली नाही.
रशियाने कोरोनावरील या वॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल जवळपास दोन महिन्यांपूर्वी सुरु केली होती. तसेच, रशियाने तयार केलेल्या वॅक्सिनबाबत अद्याप कोणताही वैज्ञानिक अहवाल प्रकाशित केलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत हेदेखील स्पष्ट झालेलं नाही की, रशियाकडून वारंवार करण्यात येणारे दाव्यांवर कितपत विश्वास ठेवणं योग्य आहे.
रशियातील वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, वॅक्सिन लवकर तयार करण्यात आली आहे, कारण ही आधीपासूनच कोरोनासारख्या इतर व्हायरससोबत लढण्यासाठी सक्षम आहे. असाच दृष्टिकोन जगभरातील इतर वैज्ञानिक आणि औषध कंपन्यांचा आहे. रशियातील संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैनिकांनी वॅक्सिनच्या ह्युमन ट्रायलमध्ये व्हॉलिंटयर्स म्हणून काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- सीरम इन्स्टिट्यूटची कोविड लस फक्त 225 रुपयांत मिळणार; गेट्स फाउंडेशनचा पुढाकार
- 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होणार, रशियाचा दावा
- Corona vaccine | ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात
- कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिने लागतील : अदर पुनावाला
- Coronavirus | कोरोना लसची प्राथमिक मानवी चाचणी यशस्वी, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा दावा