उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्यांना पुन्हा होतोय कोरोना!
दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याची वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित प्रकरणं आढळली नाहीत. विशेषतज्ज्ञांनी चुकीचं परीक्षण किंवा दुसऱ्या आजारामुळे असं झालं असल्याचं सांगितलं जात आहे.
बीजिंग : चीनच्या जिंगझोऊ शहरात एक 68 वर्षीय महिला कोरोना व्हायरसमधून ठिक झाली, परंतु सहा महिन्यांनी तिला पुन्हा कोरोनाची बाधा झाली. 9 ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा तिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याआधी 8 फेब्रुवारी रोजी तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी मध्येच ती पूर्णपणे ठिक होऊन घरी परतली होती. महिलेला क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे आणि तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
असचं काहीसं प्रकरण महिन्याभरापूर्वी इज्राइलमध्ये समोर आलं होतं. एक डॉक्टर कोरोनामुक्त झाल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. दरम्यान, सध्या तरी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होण्याची वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित प्रकरणं आढळली नाहीत. विशेषतज्ज्ञांनी चुकीचं परीक्षण किंवा दुसऱ्या आजारामुळे असं झालं असल्याचं सांगितलं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की, ठिक झाल्यानंतरही कोरोना व्हायरस शरीरातील काही भागांत राहतो.
अमेरिकेतही अशी प्रकरणं समोर
82 वर्षांच्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयाच दाखल करण्यात आलं होतं. यासंदर्भात अमेरिकेत 'अ केस रिपोर्ट ऑफ पॉसिबल नोवल कोरोना वायरस 2019 रीइनफेक्शन' नावाचा रिपोर्ट पब्लिश करण्यात आलं होतं. व्यक्तीला एक आठवडा ताप येत होता. त्यामुळे त्या व्यक्तीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनंतर कोरोना चाचणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आणि संबंधित व्यक्तीची प्रकृती आणखी खालावली.
व्हेंटिलेटरवर बरेच दिवस राहिल्यानंतर डॉक्टरांना संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आलं. परंतु, काही वेळानंतर ते पुन्हा आजारी पडले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याआधी त्यांची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली होती. परंतु, ती नेगेटिव्ह आली होती. दुसऱ्यांदा त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि ते पूर्णपणे ठिक झाले. मेडिक्सने द अमेरिकन जर्नल ऑफ इमरजन्सी मेडिसिनमध्ये चर्चा केली असता, एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली आणि त्यानंतर ती पुन्हा आजारी पडली हे कसं शक्य आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या :
Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?
कोरोनाच्या संकटकाळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्सचा ओव्हरडोस घेताय? सावध व्हा