एक्स्प्लोर

Coronavirus | कोल्हापुरात कोरोना संशयित वृद्ध नागरिकाचा मृत्यू

कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती मूळ हरियाणाची रहिवाशी होती, मात्र कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव याठिकाणी राहत होती.

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयित 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. संबधित व्यक्तीला 15 मार्चला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये (छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालय) दाखल करण्यात आलं होतं. मृत व्यक्तीचे सॅम्पल्स तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. आज त्याचे रिपोर्ट्स येणार होते, मात्र रिपोर्ट्स येण्याआधीचा या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळेच झालाय का हे रिपोर्ट्स हाती आल्यानंतर स्पष्ट होईल.

मृत व्यक्ती मूळ हरियाणाची रहिवाशी होती, मात्र कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव याठिकाणी राहत होती. संबंधित व्यक्तीने 8 मार्च ते 15 मार्च दरम्यान हरियाणा,दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता. कोल्हापुरात आल्यानंतर या व्यक्तीला सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी त्यांना कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र प्रकृती अधिक खालावल्याने आणि कोरोनाच्या धास्तीने नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमधील कोरोना कक्षात दाखल केलं. वैद्यकीय पथकाने त्यांची कोरोनाची प्राथमिक तपासणी करून उपचारासाठी आयसोलेशन कक्षात हलवले. उपचारादरम्यान वृद्धास श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.

गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.

राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर

  • पुणे - 16
  • मुंबई - 5
  • ठाणे - 1
  • कल्याण- 1
  • नवी मुंबई -  1
  • पनवेल - 1
  • नागपूर - 4
  • अहमदनगर - 1 
  • यवतमाळ -2
  • औरंगाबाद - 1

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर

  • महाराष्ट्र -33
  • केरळ - 22
  • पंजाब - 1
  • दिल्ली - 7
  • जम्मू कश्मीर - 2
  • लडाख - 3
  • राजस्थान - 4
  • उत्तरप्रदेश - 11
  • कर्नाटक - 6
  • तामिळनाडू - 1
  • तेलंगाना - 3
  • हरयाणा - 14
  • आंध्रप्रदेश - 1
#Coronavirus Positive Patients | पिंपरीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह,पुण्यात 16 तर राज्यात 33 रुग्ण

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Dada Bhuse on TET Exam Paper Leak: परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'
परीक्षेच्या आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटला, शिक्षणमंत्री दादा भुसेंनी सांगितली इनसाईड स्टोरी,म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना...'

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TET Paper Leak : आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, घरातील सर्वच सदस्य तणावात, परीक्षार्थी शिक्षकांची कारवाईची मागणी  
आमच्या मुलांचा नीटचा पेपर फुटला आता आमचा TET चा पेपर फुटला, परीक्षार्थी शिक्षकांची कठोर कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जून 2026 | शनिवार
TET Paper Leak: TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
TET पेपर कसा फुटला, पोलिसांनी सांगितली इनसाईड स्टोरी; कोचिंग क्लासेसवाले रडारवर, काय म्हणाले आयुक्त?
Surya Kumar Yadav : टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
टीम इंडियाचा आयर्लंड विरुद्ध लाजीरवाणा पराभव, सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया समोर, भारताचा माजी कर्णधार काय म्हणाला?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून पहिला उमेदवार जाहीर, फुटीर खासदारांच्या मतदारसंघातून मोठी घोषणा
Fact Check  :आरबीआयनं 2005 पूर्वी छापलेल्या महात्मा गांधी मालिकेतील 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण
RBI : 2005 पूर्वी छापलेल्या 10,20, 50 आणि  100 रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्रचं व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण 
Shashi Tharoor on Passport: पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
पासपोर्टवर सरकारचा निर्णय हास्यास्पद, जनतेमध्ये संभ्रम होतोय, पासपोर्ट आणि आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानले पाहिजेत; शशी थरुरांनी फटकारलं
TET Paper Leak: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Video: आरोपी दिल्लीतून आले, इतक्या कोटींचा सौदा? TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून खळबळजनक माहिती
Embed widget