एक्स्प्लोर

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. पण या भेटीने चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. चीनच्या एका वृत्तपत्राने मोदी-ट्रम्प भेटीवरुन चांगलीच आगपाखड केली आहे. भारताने अमेरिकेशी कितीही जवळीक साधली तरी भारताचा काहीही फायदा होणार नाही. पण ही जवळीक वाढल्यास, भारताला ते महाग पडेल असा इशारा चिनी मीडियाने दिला आहे. तसेच 1960 साली अमेरिकेने कशाप्रकारे भारताचा वापर केला हे भारताने विसरु नये, असा सल्लाही चीनने भारताला दिला आहे. 'ग्लोबल टाईम्स' नावाच्या वृत्तपत्राने संपादकीय कॉलममधील ओपिनीयन या सदरात मोदी-ट्रम्प भेटी संदर्भातील लेख प्रकाशित केला आहे. यात शितयुद्धाचा उल्लेख करुन चिनी मीडियाने भारतावर चांगलीच आगपाखड केली आहे. "1960 च्या दशकाच्या सुरुवातील सोव्हिएत युनियन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी चीनवर आपलं वर्चस्व प्रस्थापिक करण्यासाठी भारताचा वापर करुन घेतला. यासाठीच अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी भारताच्या 'इंडिया फॉरवर्ड पॉलिसीला' समर्थन दिलं होतं. पण केनेडींना जे हवं होतं ते त्यांना साध्य करता आलं नाही.'' विशेष म्हणजे, या लेखातून 1962 च्या भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाबद्दलही यातून आठवण करुण देण्यात आली आहे. भारताने चीनसोबत बरोबरी करण्यापूर्वी इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे. तसेच भारताने अमेरिकेच्या खेळी ओळखून वेळीच सावध व्हायला पाहिजे. भारताने चीनसोबतचे संबंध सौहार्द्याचे राखण्याचेच त्यांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी योग्य असल्याची, धमकी चीनी मीडियाने या लेखातून दिली आहे. याशिवाय भारत-अमेरिका संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थान मिळवणे अशक्य असल्याचं यातून सांगितलं आहे. या लेखात म्हणलंय की, "बराक ओबामा यांच्या कार्यकाळात भारताला भुलवण्यासाठी अमेरिकेनं सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाचं गाजर दाखवलं. पण यासाठी कोणतेही व्यवहारी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे भारताला सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व बहाल करण्यास ट्रम्प कितपत यशस्वी होतील?" असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच भारताने अमेरिकेसोबतचे संबंध बळकट करणं त्यांच्या हिताचं नसून, जर त्यासाठी भारताकडून प्रयत्न होत असल्यास, अशिया खंडातलं शांततेचं वातावरण बिघडू शकेल, असा इशाराच दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget