एक्स्प्लोर
इराकमधील बगदाद बॉम्बस्फोटानं हादरलं, 10 जणांचा जागीच मृत्यू
बगदाद: इराकची राजधानी असलेलं बगदाद शहर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाल्याची माहिती समजतं आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एका कारमध्ये हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या हल्ल्यात बगदादमधील एका प्रसिद्ध आईस्क्रिम दुकानाला टार्गेट करण्यात आलं होतं. काल (सोमवार) रात्री उशिरा हा स्फोट झाला. सध्या रमजानचा महिना सुरु असल्यानं संध्याकाळनंतर बाजारपेठेत बरीच गर्दी होते. त्यामुळे याचवेळी हा स्फोट करण्यात आला.
दरम्यान, या बॉम्बस्फोटाची आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, याआधी बगदादमध्ये झालेले स्फोट आयसिसनं घडवले होते. त्यामुळे आता देखील संशयाची सुई आयसिसकडेच वळते आहे. मागच्या वर्षी रमजानच्याच महिन्यात ट्रक बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये 100 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement