एक्स्प्लोर
बिल गेट्सने खरेदी केले 4600 कोटी रूपयांचे जहाज
जवळपास 370 फूट लांब असलेल्या अॅक्वा जहाजात पाच डेक आहेत. यात 14 पाहुणे आणि 31 क्रू मेंबर, एक जिम, एक योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. या जहाजात 28 टनाचे दोन व्हॅक्युम सील्ड टँक लावण्यात आले.

नवी दिल्ली : जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बिल गेट्स यांनी सुपर यॉट (Super yacht) म्हणजे अलिशान जहाज खरेदी केले आहे. या जहाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे लिक्विड हायड्रोजनवर चालते. या जहाजाची किंमत ऐकून अनेकांना धक्का बसेल. या जहाजाची किंमत तब्बल 4600 कोटी रुपये इतकी आहे. सुट्टी घालवण्यासाठी बिल गेट्स यांनी हे जहाज खरेदी केले आहे. जवळपास 370 फूट लांब असलेल्या अॅक्वा जहाजात पाच डेक आहेत. यात 14 पाहुणे आणि 31 क्रू मेंबर, एक जिम, एक योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. या जहाजात 28 टनाचे दोन व्हॅक्युम सील्ड टँक लावण्यात आले. ते मायनस 253 ड्रिग्री सेल्सिअसच्या तापमानावर उर्जा देण्यासाठी हायड्रोजन भरले जाऊ शकते. सुट्टी घालवण्यासाठी या आधी ते भाड्याने जहाज घेत होते. बिल गेट्स यांचे नवीन जहाज हे 2024 पर्यंत तयार होऊ शकते. हायड्रोजन होणार असल्याने ते केवळ पाण्याचे उत्सर्जन करेल. आणि इको फ्रेंडली असणार आहे. जहाजाच्या मागे सनबाथ किंवा स्विमिंग साठी एक लोअर लाँज एरिया दिला आहे. तर वरच्या बाजुला आउटडोल डायनिंग साठी इंटरनेटिंग स्पेस दिला आहे. जहाजात रात्री थंडी वाजू नये किंवा खोली गरम करण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यात येणार नाही. तर जेल फ्युल्ड फायर बॉल्सचा वापर करण्यात येणार आहे. जहाजाच्या डिजायनर जहाजाच्या डिजाईनविषयी सांगितले की, मी माझ्या प्रत्येक प्रकल्पात टीमला आणि स्वत:ला आव्हान देतो आणि ती आव्हाने आम्ही एकत्र पूर्ण करतो. अॅक्वा विकासासाठीची प्रेरणा आम्ही समजूतदार आणि दूरचा विचार करणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीतून घेतली आहे. त्यामुळेच आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान, पाणी आणि लिक्विड हायड्रोजन इंधन प्रणालीसह एक सुपरयॉट तयार केले आहे. Brahmos | भारतीय हवाई दलाची दोन ब्रम्होस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी | ABP Majha संबंधित बातम्या : व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज 'असे' मिळवा परत
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र























