एक्स्प्लोर
बांग्लादेश हल्ल्याचा मास्टरमाइंड तमीमसह तिघांचा खात्मा

ढाका : बांग्लादेशातील गुलशन कॅफेवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तमीम अहमद चौधरी याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं आहे. चौधरीसोबत आणखी दोन अतिरेक्यांचाही बांग्लादेशी पोलिसांनी खात्मा केला आहे. काही दिवसांपूर्वी ढाका शहरातील कल्याणपूर भागात केलेल्या छापेमारीदरम्यान पोलिसांना तमीमबद्दलचे पुरावे हाती लागले होते. जमात उल मुजाहिदीन बांगलादेश संघटनेचा म्होरक्या तमीमला शोधण्यासाठी पोलिसांनी खास पथकही स्थापन केली. तमीमशिवाय दोघांना यमसदनी पाठवण्यात पोलिसांना यश आलं आहे. तमीम कॅनडियन-बांगलादेशी वंशाचा होता. ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात एका भारतीय तरुणीसह काही परदेशी नागरिकांनाही जीव गमवावा लागला होता. त्यावेळी 10 तास चाललेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता, तर एकाला जिवंत पकडण्यात आलं होतं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
पुणे
धुळे























