एक्स्प्लोर

Salman Rushdie : सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर गुन्हा दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोप

Salman Rushdie attack : जगप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Author Salman Rushdie attack : लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. न्यूजर्सी येथील 24 वर्षीय आरोपी हादी मतार (Hadi Matar) याच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला 15 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. 

"सलमान यांच्यावरील हल्ल्यासाठी जबाबदार आरोपी हादी मतार याच्यावर आता हत्येचा प्रयत् केल्याचा औपचारिक आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला शुक्रवारी रात्री विना जामीन अटक करण्यात आलं आहे." असं वकील जेसन श्मिट यांनी एका निवेदनात म्हटले आहे.  संबधित आरोपी हा बनावट लायसन घेऊन जवळपास 650 किमी दूरहून ड्राईव्ह करुन आल्याचंही तपासात समोर आलं आहे.

रश्दी यांना गंभीर दुखापत

सलमान रश्दी यांच्या प्रकृतीबाबत समोर आलेल्या माहितीत त्यांना गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. त्यांना एक डोळा गमवावा लागू शकतो असंही समोर आलं असून त्यांच्या यकृतावर चाकूने वार झाल्याचंही समोर आलं आहे. ते शुक्रवारी रात्री व्हेटिंलेटरवर असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

व्याख्यानापूर्वी झाला हल्ला

न्यूयॉर्कमधील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने वार करण्यात आले असून त्यात ते जखमी झाले आहे. शुक्रवारी सकाळी व्याख्यान देण्यापूर्वी CHQ 2022 कार्यक्रमाच्या मंचावर असताना 75 वर्षीय सलमान रश्दी यांच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मिडनाईट्स चिल्ड्रन (Midnight's Children) तसंच द सॅटेनिक व्हर्सेस (The Satanic Verses) ही सलमान रश्दी यांची गाजलेली पुस्तकं आहेत.   

'द सॅटेनिक व्हर्सेस' या पुस्तकामुळे वादात

सलमान रश्दी हे एक जागतिक किर्तीचे लेखक असून बुकर पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांनी लिहिलेल्या द सॅटेनिक व्हर्सेस या पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात वाद झाले होते. 1980 च्या दशकात सलमान यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे वाद ओढावला होता. खासकरुन मुस्लिम समाजात त्यांच्या या पुस्तकामुळे वाद झाला होता. दरम्यान द सॅटॅनिक व्हर्सेस आणि मिडनाईट चिल्ड्रन यांसारख्या पुस्कांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रश्दी यांच्यासाठी एका धार्मिक नेत्याने त्यांच्या हत्येचा फतवा देखील काढला होता.  

कोण आहेत सलमान रश्दी?

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले सलमान रश्दी गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. त्यांची पहिली कादंबरी 1975 मध्ये आली. त्यांना त्यांच्या मिडनाइट्स चिल्ड्रन (1981) साठी बुकर पारितोषिक देखील मिळाले. ही कादंबरी आधुनिक भारताबद्दल आहे. त्यांचं चौथं पुस्तक, द सॅटॅनिक व्हर्सेसमुळे (1988) त्यांना वादात अडकावे लागले होते. सलमान रश्दी यांना त्यांच्या 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तका त्यांना अनेक धमक्या देखील आल्या आहेत. या पुस्तकावर 1988 पासून इराणमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पुस्तकात इस्लाम धर्माची निंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. या वादानंतर आलेल्या धमक्यांना न जुमानता त्यांनी 1990 च्या दशकात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 2007 मध्ये इंग्लंडच्या राणी दुसरी एलिझाबेथ यांनी त्यांना साहित्य क्षेत्रातील सेवांसाठी 'सर' ही पदवी प्रदान केली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका घेतली का? सिद्धार्थ मोकळे म्हणाले...
Pune Election : पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
पुण्यात आंदेकर वि. कोमकर गँगवॉर आता राजकारणातही; मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आईने अर्ज भरला
Embed widget